Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वर्धा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने घराचे बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून घर लुटण्याचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 27, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
वर्धा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तीने घराचे बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून घर लुटण्याचा प्रयत्न, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा नंबर :- 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आरोपीतांनी संगणमत करुन कट रचुन फिर्यादी यांचे वडीलोपार्जीत वर्धा येथील शिट नं. 14 नगर भूमापन क्रमांक 109 मारवाडी मोहल्ला, पटेल चौक, वर्धा येथील घराचे बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करुन व बनावट मृत्युलेख तयार
करुन सदरचे घर हडप करण्याचे उद्देशाने फिर्यादी यांची फसवणुक केली. फिर्यादी यांचे तक्रारीवरून पोलिस स्टेशन वर्धा (शहर) येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर गुन्हयाची गंभीरता बघता गुन्हयाचा तपास पोलिस अधीक्षक यांचे आदेशाने आर्थिक गुन्हे शाखा, वर्धा हे करीत होते सदर गुन्ह्याचे तपासात यातील फिर्याद मधील आरोपीतांना यापुर्वीस अटक करण्यात आली असुन गुन्ह्यातील ईतर बाबींवर कसोशीने तपास सुरु असतांना आरोपी राजेश शामलाल जयस्वाल वय 52 वर्ष, रा. पोद्दार बगीचा रामनगर वर्धा याचा सक्रीय सहभाग असल्याचे तपासात प्राप्त पुराव्यावरुन दिसुन आल्याने त्यास गुन्हयात आरोपी करण्यात आले होते.

सदर आरोपी याने ईतर आरोपीतांसह गुन्ह्यातील मालमत्तेचे कागदपत्र नसल्याने बनावट मृत्युपत्र लेख तयार करुन सदरची मालमत्ता नावावर झाल्यानंतर जास्त किंमतीमध्ये विकुन आरोपी राजेश जयस्वाल याचा वाटा जास्त असल्याने मालमत्तेचा मूळ लेख स्वतःचे ताब्यात ठेवून घेतला. सदर आरोपी हा गुन्ह्यात अटक होण्यास टाळत असल्याने न्यायालयाकडुन सर्च वारंट प्राप्त करुन आरोपीचे रहाते घराची कायदेशीर रित्या झडती घेतली असता गुन्ह्यातील मूळ मृत्युपत्राच्या लेखाची छायांकित प्रत हस्तगत करण्यात आली आहे. सदर आरोपी याने वर्धा शहरामध्ये बऱ्याच मालमत्तेचे बनावट खरेदी खत व बनावट मृत्युपत्र तयार करुन लोकांची मालमत्ता हडप केल्याचे तपासात दिसुन आले आहे.

आरोपी राजेश जयस्वाल हा वर्धा शहरात अवैध दारु विक्री, जुगार, सट्टा, चेंगड अशा प्रकारचे अवैध व्यवसायातुन व गुंड प्रवृत्तिच्या लोकांना हाताशी धरुन वर्धा शहरातील लोकांच्या मालमत्तेचे बनावटी कागदपत्र तयार करुन व मालमत्ता खाली करुन घेवुन हडप करुन घेतो. त्यामुळे त्याचे विरुद्ध पोलिस स्टेशन रामनगर व वर्धा शहर येथे बरेचशे गुन्हे नोंद आहेत. आरोपी राजेश जयस्वाल याने गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविणे करीता सत्र न्यायालय, वर्धा येथे जामीन करीता अर्ज दाखल केला असता न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यानंतर आरोपी याने उच्च न्यायालय खंडपीठ नागपुर येथे अटक पुर्व जामीन मिळविण्याचे प्रयत्न केले असता येथे सुद्धा त्याची जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपी हा नमुद गुन्ह्यात पोलिसांचे अटके पासुन पळ काढत होता शेवटी नाईलाजाने आरोपीने मा. सत्र न्यायालयात वर्धा येथे दिनांक 23-08-2023 रोजी शरणागती पत्करली वरुन आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांनी आरोपी राजेश जयस्वाल यास अटक करुन मा. न्यायालयाकडुन आरोपीचा पी.सी.आर प्राप्त केला आहे व पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कांचन पांडे, पो.उप.नि पवन भांबुरकर व स्टाफ पोहवा संतोष जयस्वाल, गजानन काळे, शैलेश भालशंकर, निकेश गुजर, कुनाल डांगे, स्वनिल भारव्दाज, आशिष महेशगौरी, प्रतिक नगराळे, मनापोशि ज्योत्स्ना रोकडे, चालक मनोज झाडे यांनी केली.

Previous Post

हिंगणघाट शहरातील अनेक युवक व महिलांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश.

Next Post

राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार : ना. सुधीर मुनगंटीवार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार : ना. सुधीर मुनगंटीवार

राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार : ना. सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In