मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून भारत विद्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजु कारवटकर यानी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक हरिष भटटड, पर्यवेक्षिका प्रतिभा शंभरकर, पर्यवेक्षक विनोद नांदुरकर, क्रिडा शिक्षक विनोद कोसुरकर आदी उपस्थित होते.
याप्रंसगी मुख्याध्यापक राजु कारवटकर म्हणाले की भारतातली क्रीडा परंपरा जपण्यासाठी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद हे नाव भारतातल्या प्रत्येक क्रीडाप्रेमीला ठाऊक असेल. स्वातंत्र्यपूर्व काळात मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगात मानाचं स्थान मिळवून दिलं होतं. 1928, 1932 आणि 1936 अशा तीन सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ध्यानचंद यांच्या जादूई खेळामुळे भारतानं सुवर्णपदकावर आपली मोहोर उमटवली होती. हॉकीच्या मैदानात ध्यानचंद यांनी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. भारत देश गुलामीत होता त्यावेळी भारताची विदेशातील ओळख म्हणजे हॉकी आणि ध्यानचंद अशीच होती. भारतीय हॉकीला सुवर्णकाळ मिळवून देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांना जागतिक क्रीडा विश्वात हॉकीतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. त्यांची खेळातली चपळता आणि कौशल्य जबरदस्त होतं. त्यामुळंच त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार विनोद कोसुरकर यानी केले. यावेळी भारत विद्यालय ये शिक्षकवृंद आणि विध्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

