मानवेल शेळके नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- मधुकररावजी पिचड प्राथमिक आश्रम शाळा शेरी ता. देवळा, जिल्हा नाशिक येथील आदिवासी मुला – मुलींसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रक्षाबंधन हा सण बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो.
आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणामध्ये साजरा करण्यात येतो. भावा-बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने खरं तर ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये ‘कजरी-पौर्णिमा’, पश्चिम भारतामध्ये ‘नारळी पौर्णिमा’ या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख–सांभाळ कर असा संकेत देण्यात आला आहे.त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगारी भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे.
प्रत्येक जण हा सण आपल्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण घरापासून दूर असलेल्या मुलांकडे कोणी जास्त लक्ष देत नाही तसेच त्यांच्या आनंदात आपला आनंद शोधला की आपला आनंद द्विगुणित होतो. या आश्रम शाळेमध्ये सर्व सुविधा उत्तम आहेत. शिक्षक (गुरु) चांगल्या प्रकारे मुला -मुलींना मार्गदर्शन करतात. म्हणूनच रक्षाबंधन हा सण या वर्षी थोड्या नवीन प्रकारे म्हणजेच मधुकररावजी पिचड प्राथमिक आश्रम शाळा शेरी ता. देवळा, जि. नाशिक येथील आदिवासी मुला – मुलींसोबत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुलींनी शाळेतील सर्व मुलांना (भावांना) राखी बांधली व मुलांनी मिठाई देऊन बहिणीचे तोंड गोड केले व सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले.
रक्षाबंधन हा बहीण भावाचे प्रेम टिकवून ठेवण्याचा सण आहे.आपल्या धर्मात असे अनेक सण परंपरा फार पूर्वी पासून सुरु आहेत. ह्या परंपरा आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि रक्षाबंधन देखील त्यातील एक सुंदर परंपरा आहे.म्हणूनचं बहीण भावाचं नातं अतूट आहे. शाळेमधील मुले मुली चांगल्या प्रकारे एकत्र राहून शिकत असतात. शाळेचे व्यवस्थापन, जेवण व सुविधा चांगल्या प्रकारे मिळत असल्याने मुले मुली चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षाली गुंजाळ मॅडम, श्री.दिपक आहेर सर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विठ्ठल ठोंबरे, उपाध्यक्ष श्री ऍड. अमोल रंजाळे, रवींद्र आहेर सर, श्री. विशाल गोरे(सरपंच), श्री. दिपक शेळके, श्री. भाऊसाहेब सानप सर, श्री. अमोल लेंडे, सौ. दिपाली रौदंळ मॅडम, श्री. ऍड.अजय मूर्तडक, सौ. बिजली पवार मॅडम, श्री. ऍड. प्रकाश बेंद्रे, श्री. दिपक पाटील सर, श्री. सचिन पवार सर, चंद्रसिंग वडवे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

