Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सागर ऊर्फ यल्ल्या कोळानट्टी (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील १९ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
August 30, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सागर ऊर्फ यल्ल्या कोळानट्टी (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील १९ सदस्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626

शिवाजीनगर पोलीस स्टेशन, पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दि. १६/०८/२०२३ रोजी फिर्यादी व त्यांचा मित्र नितीन म्हस्के हे मंगला टॉकिज येथुन गदर-2 सिनेमा पाहून घरी जात असताना, मंगला टॉकिजच्या एक्झिट गेटच्या बाहेर सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (टोळीप्रमुख) वय अंदाजे ३२ वर्षे, रा. महात्मा फुले वसाहत, १३ ताडीवाला रोड, पुणे व त्याचे इतर टोळी सदस्य यांनी फिर्यादी यांचे मित्र नितीन म्हस्के याचे डोक्यात तसेच मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या व फरशीचे तुकडे यांनी मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले. म्हणून दिले फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाणे, पुणे शहर गुन्हा रजि नं. १७१ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४७, १४८, १४९, १२० (ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५, महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५, अनुसुचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) (R). ३ (२) (va). ३ (२) (v) व ६ हा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.दाखल गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सदरचा गुन्हा हा आरोपी नामे १) सागर ऊर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी, वय ३५ वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे (टोळी प्रमुख) २) सुशील अच्युतराव सुर्यवंशी, वय २७ वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे ३) मल्लेश शिवराज कोळी वय २४ वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे ४ ) मनोज विकास हावळे, वय २३ वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे ५) रोहन मल्लेश तुपधर, वय २३ वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे ६) शशांक ऊर्फ ऋषभ संतोष बेंगळे, वय २१ वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे ७) गुडगप्पा फकीराप्पा भागराई, वय २८ वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे ८ ) किशोर संभाजी पात्रे, वय २० वर्षे, रा. रमाबाई आंबेडकर रोड, पुणे ९) साहील ऊर्फ सल्ल्या मनोहर कांबळे, वय २० वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे १० ) गणेश ऊर्फ गणपत शिवाजी चौधरी, वय २४ वर्षे, रा. ढोले पाटील रोड, पुणे ११) रोहीत ऊर्फ मच्छी बालाजी बंडगर, वय २० वर्षे, रा. ताडीवाला रोड, पुणे १२) विकी ऊर्फ नेप्या काशीनाथ कांबळे वय २२, रा. ताडीवाला रोड, पुणे १३ ) इम्रान हमीद शेख, वय ३१ वर्षे, रा. ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे १४ ) लॉरेन्स राजू पिल्ले, वय-३६ वर्षे रा. ताडीवाला रोड, पुणे १५) आकाश सुनिल गायकवाड ऊर्फ चड्डी, वय-२२ वर्षे, रा. जनता वसाहत, पुणे १६) विवेक भोलेनाथ नवघरे, वय २५ वर्षे, रा. ताडीवाला रोड, बंडगार्डन, पुणे १७) अक्षय ऊर्फ बंटी विजय साबळे, वय २५ वर्षे, रा. केशवनगर, मुंढवा, पुणे १८) विनायक गणेश कापडे, वय २१ वर्षे, रा. विमाननगर, पुणे १९ ) प्रदिप संतोष पवार, वय २१ वर्षे, रा. विमाननगर, पुणे २०) सौरभ बाळु ससाणे वय २० वर्षे, रा. विमाननगर, पुणे ( टोळी सदस्य) यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.नमुद आरोपी टोळी प्रमुख सागर ऊर्फ यल्ल्या इराप्पा कोळानट्टी याने त्याचे साथीदारांसह यांचेसह संघटित गुन्हेगारी टोळी तयारी केली असुन सदर टोळीने बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती साठी इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी संघटनेचा सदस्य म्हणुन किंवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून किंवा हिंसाचार करण्याची धमकी देवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा जुलुम जबरदस्ती करून किंवा अन्य अवैद्य मार्गाने आपली बेकायदेशीर कृत्य चालू ठेवून, संघटना किंवा टोळी म्हणून संयुक्तपणे संघटित गुन्हेगारी कृत्य करणारा गट तयार करून दुखापत किंवा हमला इत्यादी करण्याची धमकी देवून किंवा हमला इत्यादी करण्याची पूर्वतयारी करून स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत निर्माण करण्याकरीता त्यांनी संघटितपणे व वैयक्तीकपणे, खुन करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्राव्दारे जखमी करणे.. बेकायदेशीर घातक शस्त्र जवळ बाळगणे, दंगा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीसाचे आदेशाचा भंग करणे, नागरीकांना मारहाण करुन जखमी करणे, शिवीगाळ करुन व हत्यारांचा धाक दाखवुन नागरिकामध्ये दहशत पसरवणे, दरोडा घालणे यासारखे गंभीर व हिंसक गुन्हे केलेले आहेत. त्यांचेवर पुणे शहरातील विविध पोलीस स्टेशन येथे शरीरा विरुध्दचे व माला विरुध्दचे गुन्हे दाखल असून, त्यांचेवर प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील त्यांनी पुन्हा पुन्हा गुन्हे केलेले आहेत. दाखल गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (i), ३(२), ३(४) प्रमाणे कलम वाढविण्यासाठी सदर मान्यता मिळणे बाबतचा प्रस्ताव मा. सहायक पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग, श्री वसंत वामन कुवर यांनी मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०१ पुणे श्री संदीपसिंह गिल यांचे मार्फतीने मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील याना सादर केला होता….सदर प्रकरणी छाननी करून शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजि नं. १७१ / २०२३ भा.द.वि. कलम ३०२, १४१,१४२, १४३,१४४, १४५, १४७, १४८, १४९, १२०(ब) सह भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१) (३) १३५ अनुसुचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ चे कलम ३ (१) ( R) 3 ( २ ) (va), ३(२) (v) व ६ या गुन्हयात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (i), ३ ( २ ) . ३ ( ४ ) या कलमाचा अंतर्भाव करण्याची मा.अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर. श्री. प्रविणकुमार पाटील यांनी मान्यता दिलेली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. सहा पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग श्री वसंत कुबर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. रितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. संदीप कर्णिक मा. अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०१. श्री. संदीपसिंह गिल यांचे मार्गदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग श्री वसंत कुंवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे श्री धन्यकुमार गोडसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विक्रम गौड, सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलीस अमलदार, मेमाणे, दिलीप नागरे, रोहित झाबरे यांनी केली आहे.

मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री रितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्या नंतर गुन्हेगारी नियंत्राणांवर बारकाईने लक्ष देवुन शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे कारणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मकोका अंतर्गत केलेली ही ५५ वी कारवाई आहे.

Previous Post

रत्न विद्या निकेतन व बन्सीलाल कटारिया हायस्कूल, हिंगणघाट येथील 17 वर्षे वयोगट शालेय हॉकी संघाची विभागीय स्पर्धेकरिता निवड.

Next Post

अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दिशादर्शक फलक लावा, उमेश इंगळे यांची मागणी.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दिशादर्शक फलक लावा, उमेश इंगळे यांची मागणी.

अकोला येथील शासकीय सर्वोपचार रुग्णालयात दिशादर्शक फलक लावा, उमेश इंगळे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In