मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वर्धा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे द्वारा पोलीस मुख्यालय वर्धा च्या मैदानावर दिनांक 29 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या. शालेय जिल्हास्तरीय हॉकी या क्रीडा स्पर्धेत श्री. वर्धमान स्थानकवासी श्रावक संघ, हिंगणघाट द्वारा संचालित रत्न विद्या निकेतन व बन्सीलाल कटारिया हायस्कूल, हिंगणघाट च्या 17 वर्षे वयोगटा मध्ये चैतन्य बांगडे, हर्ष हिवसे, हंशील रामटेके, सम्राट डुकरे, वैभव शिवणकर, वेदांत गोंदे, विज्वल रावी, आयुष वाकेकर, चेतन वायदुडे, मीत मुनेश्वर, जय गटागट, जैनुल अजानी, तन्मय महाबुदे, तन्मय उपश्याम, देवांश वरघने, नयन वाढइ, निखिल पांडे व प्रथमेश खोडे यांनी जिल्हास्तरीय शालेय हॉकी या स्पर्धेत उत्कृष्ट अशी कामगिरी दाखविली व यश संपादन करून आपल्या शाळेला नावलौकिक मिळवून दिला. व विभागीय हॉकी स्पर्धेकरिता आपले स्थान कायम केले.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष श्री. भागचंदजी ओस्तवाल, उपाध्यक्ष श्री. विनयजी लोढा, सचिव, श्री. हेमंतकुमार ओस्तवाल, कोषाध्यक्ष, श्री. राजेंद्रजी सिंघवी, सदस्य, श्री. राजेशजी कोचर, डॉक्टर, श्री. लोकेश ललवानी, श्री. हेमंतजी चोरडिया, श्री. महेंद्रजी कासवा, श्री. महेंद्रकुमार कटारिया, सौ. राजमती कटारिया व श्रीमती. चंद्रकांतादेवी कटारिया यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. हे यश संपादन करण्याकरिता क्रीडा शिक्षक श्री. अतुल झाडे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच, शाळेचे मुख्याध्यापक श्री. अजयकुमार यादव यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले. या यशाबद्दल शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

