माजी आमदार अँड संजय धोटे व लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे यांची उपस्थिती
तिरुपती नाल्लला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचांदूर:- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले असून, केंद्र सरकारच्या योजना घर घरात पोहचव्या या उद्देशाने भारतीय जनता पार्टी गडचांदूर तर्फे घर चलो अभियानाचा शुभारंभ माजी आमदार अँड संजय धोटे व लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे यांचे उपस्थित करण्यात आली,
मोदी सरकारला 9 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून जनतेला लाभ व्हावा या उद्देशाने मोदी सरकार काम करत आहे, भारतीय जनता पार्टी गडचांदूर शहर तर्फे घर चलो अभियान मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला, यावेळी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे व लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे तसेच स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत गडचांदूर शहरातील व्यापारी, डॉक्टर वकील तसेच नागरीक याना भेट देत त्यांना पत्रक वाटप करण्यात आले,
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेलं कार्य हे जनतेपर्यंत पोहचावे तसेच सरकारने केलेल्या कार्याचा लेखाजोखा नागरिकांना माहिती व्हावी यासाठी अभिमान राबविण्यात आले, यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

