पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
खंडणी विरोधी पथक – २ गुन्हे शाखा, पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुणे शहर व परिसरामध्ये वेगवेगळ्या ऑनलाईन माध्यमातून मोबाईल फोन मागविणा-या ग्राहकांना मोबाईल फोन ऐवजी मोबाईल फोनच्या बॉक्समध्ये फरशीचा तुकडा, साबणाची वडी व बंद असणारे जुने मोबाईल फोन दिले जात होते. या संदर्भात प्राप्त तक्रारीचे अनुशंगाने मा. पोलीस उप आयुक्त अमोल झेंडे गुन्हे शाखा यानी समांतर तपास करण्याच्या सुचना दिल्या होत्या. फसवणुकीची प्रकार पाहता यागध्ये डिलिव्हरी बॉय, कर्मचारी सहभाग असल्याची शक्यता लक्षात घेवुन माहीती घेत असताना माणीक मोबाईल शॉपी हडपसर पुणे येथे फ्लिपकार्ड द्वारे ऑनलाईन मोबाईल फोन मागविणा-या ग्राहकांना मोबाईल फोन हे व्यवस्थित पॅक करुन डिलेव्हरी बॉय यांचेकडे दिले असता ग्राहकांना मोबाइल फोन ऐवजी फरशीचे तुकडे साबणाच्या वडया आणि बंद पडलेले मोबाईल मिळाल्या बाबत तक्रारी प्राप्त होत्या. त्या अनुशंगाने माणिक मोबाईल शॉपीचे मालक यांनी त्याचे मोबाईल शॉपीमधुन ग्राहकांनी ऑनलाईन मागविलेले ३१ मोबाईल फोनची अशाच प्रकारे अपहारकरुन एकूण ०७,२७,३१९ फसवणुक केलेबाबत माणीक मोबाईल शॉपीचे मालक यांनी हडपसर पो. स्टे. पुणे येथे गु.र.नं. २५०/२०२३ भादवि फलम ४०८ ४२० अन्वये दिनांक ०९/०२/२३२३ रोजी अज्ञात आरोपी यांचे विरुद गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयाचा समातंर तपास करीत असताना खंडणी विरोधी पथक -२ गुन्हे शाखा पुणे शहर यांचेकडील पोलीस अंमलदार विनोद सांळूके व अमोल पिलाने यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन खंडणी विरोधी पथक २ ने पुणे शहरामध्ये फ्लिपकार्ड या कंपनीचे कर्मचारी १) मोईन मोहम्मद हलीम सय्यद वय ३० रा. तळेगाव दाभाडे पुणे २) आकाश राजकुमार निकम वय – ३२ रा. विमाननगर पुणे ३) रणजितकुमार राजगीर मंडल वय २५ रा. महंमदवाडी पुणे, ४) तुकाराम कृष्णा चौगुले पय-३० रा. रायकरमळा धायरी पुणे यांना ताब्यात घेवून यांचेकडुन एकुण ४ ५१,०४३ रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे नमुद गुन्ह्यातील १९ मोबाईल फोन जप्त करून ताब्यात घेण्यात आले आहेत.नमुद आरोपी है फ्लिपकार्ड कंपनीकडे स्कॅनर, डिलीव्हरी बॉय, चालक म्हणून कामास असुन ते मोबाईल शॉपीमधुन मोबाईल फोन घेतल्या नंतर परस्पर त्या बॉक्समधुन मोबाईल काढुन त्या ठिकाणी फरशीचे तुकडे साबणाच्या वडया आणि बंद पडलेले मोबाईल फोन ग्राहकांना देवुन मोबाईल शॉप नालकांची व ग्राहकांचीफसवणुक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद आरोपी हे सध्या पोलीस कस्टडीमध्ये असुन अधिक तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक श्री प्रताप मानकर, सहा.पो.निरी. चांगदेव सजगने, पो.उप निरी.मोहनदास जाधव, पो. उप निरी श्रीकांत चव्हाण पोलीस अंमलदार विनोद साळुंके, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, राहुल उत्तरकर, चेतन आपटे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, प्रदिप शितोळे, आशा कोळेकर, प्रदीप गाडे यांनी केलेली आहे.

