व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष व्येकटेश दुडमवार यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्यातील सर्व व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची येत्या 2 सप्टेंबर 2023 ला अहेरी तालुका बैठक आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला विदर्भाचे कार्याध्यक्ष सुमित पाकलवार, विदर्भाचे सहसचिव प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष, नासिर हाशमी, जिल्हा सरचिटणीस कैलास शर्मा येत आहेत.
दिनांक 2 सप्टेंबर 2023 ला सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह आलापल्ली येथे या बैठकी चे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत ओळखपत्र, पत्रकार भवन व इतर महत्वाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येणार आहे. सोबत सर्वांनी आपला दोन साईज पासपोर्ट व आधार कार्ड बैठकीला येतांना सोबत आणावे. करीता तालुक्यातील सर्व पत्रकारांनी या महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन व्येंकटेश दुडमवार जिल्हाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया, गडचिरोली यांनी केल आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445318

