निखिल पिदूरकर, कोरपणा तालूका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोयगांव (दि. 31):- स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे श्री. विजय बापूराव वनकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या श्री.विजय बापूराव वनकर यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चटप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. बी. झेड. निखाडे, श्री. डी. डी. ठाकरे, श्री. जी. एम. लांडे, कु. व्ही. टी. वैद्य, श्री. डी. टी. पानघाटे, श्री. चंदन चायकाटे (लिपिक) श्री. श्रीमती सुरेखा पिपळशेंडे श्री. डी. आर. चिने उपस्थीत होते. मंगल वादनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. डी. डी. ठाकरे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मा. मुख्याध्यपकांनी सत्कार मुर्तीनी शाळेच्या विकासात दिलेल्या योगदाना बद्दल प्रशंसा केली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जी. एम. लांडे यांनी तर आभार कु. एस. एन. गाडगे यांनी मानले.

