मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- रक्षाबंधन म्हणजे भावा बहिनितील अतूट नाते जोपासण्याचा सण. महिला वर्गाला संरक्षण देऊन त्यांना योग्य न्याय देण्याचे कर्तव्य पोलिस कर्मचारी पदोपदी बजावत असतात. म्हणजेच जबाबदार भावाची जबाबदारी पोलिस कर्मचारी पार पाडीत असतात. म्हणूनच भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा चे वतीने हिंगणघाट पोलिस ठाण्यात जाऊन आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
भाजपा महिला मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांनी ठाणेदार मारुती मुळूक तसेच पोलिस कर्मचारी वर्गाला राखी बांधून रक्षाबंधन साजरे केली. यावेळी शहराध्यक्ष अनिता माळवे, महामंत्री छाया सातपुते, अल्पसंख्याक महिला मोर्चाच्या कौसर अंजुम, विधानसभा प्रमुख नलिनी सयाम, सरिता देशपांडे, रजनी सावळे , नीता गेडेकर आदींनी पोलिस कर्मच्याऱ्याना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

