अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला 2 सप्टेंबर:- अकोल्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे उपचारासाठी डॉक्टर कडे गेलेल्या तरुणीला डॉक्टरने अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे.
अकोला शहरातील एक डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या तरुणी बरोबर अश्लील स्पर्श करत तिचा विनयभंग केला. यानंतर तरुणीने रामदासपेठ पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी सदर डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. प्रसिद्ध डॉक्टरने केलेल्या या प्रकारामुळे अकोला शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपी डॉक्टर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
नेमकी काय आहे घटना…
पीडित तरुणी अमरावती येथे शिक्षणासाठी असते. रक्षाबंधनानिमित्त तरुणी अकोला येथे घरी आली होती. तरुणीला किडनी स्टोनचा त्रास आहे. यामुळे तरुणी शहरातील प्रसिद्ध हार्ट आणि किडनी स्टोन स्पेशालिस्ट डॉक्टरकडे भावासोबत गेली. डॉक्टरने भावाला बाहेर थांबवून तरुणीला एकटीला केबिनमध्ये चेकअपला घेतले. चेकअप करता करता डॉक्टर तिच्याशी अश्लील चाळे करु लागला.
चेकअप करताना डॉक्टरने तरुणीचे कपडे वर केले. मग तिच्या प्रायव्हेट पार्टला हात लावला. तरुणीने डॉक्टरला जाब विचारला असता आपण असेच चेकअप करतो असे डॉक्टरने सांगितले. यानंतर डॉक्टरचे कृत्य पाहून तरुणीने आरडा ओरडा केला. तिचा आवाज ऐकून भाऊ आत आला. तरुणीने भावाला घडला प्रकार सांगितला. भावाने डॉक्टरला सुनावले. यानंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दोघा बहिण-भावाला बाहेर काढले.
तरुणीने थेट पोलीस स्टेशन गाठत या डॉक्टर विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेनंतर डॉक्टर फरार झाला आहे. डॉक्टरने याआधीही एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याची माहिती मिळते.

