दशरथ गायकवाड, पुणे प्रतिनिधी
पुणे:- खंडणी विरोधी पथक – १, गु न्हे शाखा, पुणे शहर पथकातील अधिकारी सपोनि अभिजीत पाटील, पोलीस उप-निरीक्षक विकास जाधव व पोलीस अंमलदार स्टाफ असे परिमंडळ-१ च्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, खंडणी विरोधी पथकातील पोलीस अंमलदार यांना त्यांच्या गुप्त बातमीदारा मार्फत बातमी ● मिळाली की, इसम नामे साहिल मुलाणी हा ३६७, गंज पेठ येथील नुर केटरर्सच्या मागच्या बाजूस असलेल्या खोलीमध्ये विक्रीस बंदी असलेल्या गुटख्याची साठवणूक करून विक्री करीत आहे..
त्याबाबत वरिष्ठांना माहिती देवून वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथक १ कडील अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी ३६७, गंज पेठ येथील नुर केटरर्स या ठिकाणी छापा टाकला असता, सदर ठिकाणी दोन इसम मिळून आले, त्या इसमाकडे चौकशी करता त्यांनी त्यांची नावे १) खाँजा ऊर्फ साहिल असलम मुलाणी, वय २० वर्षे, रा. स.नं. ३६७, महात्मा फुले गंज पेठ, पुणे २) शादाब मुशताक नाईकवाडी, वय २४ वर्षे, रा. छोटी मस्जीद जवळ, २००, गंज पेठ, पुणे असे असल्याचे सांगितले. सदर खोली मध्ये विमल गुटखा पान मसाला याच्या पुडयांची पाकिटे हे बारदान पोत्यामध्ये भरून ठेवली असल्याचे दिसले.
सदर साठयाच्या मालकी बाबत नमूद दोन्ही इसमांकडे चौकशी केली असता, त्यांनी तो साठा त्यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. सदर ठिकाणची दोन पंचासमक्ष झडती घेतला असता सदर ठिकाणी एकुण १०,५६,६४०/- रुपये किंमतीचा विमल पान मसाला गुटखा मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला असून इसम नामे १) खाँजा ऊर्फ साहिल असलम मुलाणी, वय २० वर्षे, रा. स.नं. ३६७, महात्मा फुले गंज पेठ, पुणे २) शादाब मुशताक नाईकवाडी, वय २४ वर्षे, रा. छोटी मस्जीद जवळ, २०० गंज पेठ, पुणे यांचे विरुध्द खडक पोलीस ठाणे, पुणे शहर गु.र.नं. २६३ / २०२२ भा.दं.वि. कलम १८८, २७२, २७३,३२८, ३४ व अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ चे कलम ३० (२) (अ), ३१ (१), २६ (२) (I) २६ (२) (IV), अन्नसुरक्षा मानदे कायदा प्रोव्हिबिशन ॲन्ड रिस्ट्रीक्शन ऑन सेल नियमन २०११ चे नियमन २,३,४ चे उल्लंघन केले आहे. तसेच सह वाचन ३ (1) ZZ चे उल्लंघन केल्याने ५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक १ कडील सपोनि अभिजीत पाटील करीत आहेत..
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस सहआयुक्त, श्री.संदीप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे). श्री. श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मा. सहायक पोलीस आयुक्त १ गुन्हे शाखा, श्री. गजानन टोम्पे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक, श्री अजय वाघमारे, सहा.पो.निरी. अभिजीत पाटील, पोलीस उप-निरीक्षक, विकास जाधव, पोलीस अंमलदार, संजय भापकर, सयाजी चव्हाण, नितीन कांबळे, किरण ठवरे, दुर्योधन गुरव, राजेंद्र लांडगे, विजय कांबळे, प्रफुल्ल चव्हाण यांनी केली आहे.

