पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- महानगर पालिकेचे उपायुक्त घनकचरा व व्यवस्थापन विभागाचे डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागातील डॉ. बहिरवार व डॉ. जोशी यांच्या सहयोगातून नागपुर महानगर पालिकेत कार्यरत असलेल्या सफाई कामगारांनसाठी प्रत्येक शनिवार ला आरोग्य शिविराचे आयोजन महानगर पालिकेच्या प्रत्येक झोन मध्ये करण्यात येत असते.
याचेच औचित्य साधून शनिवार ला नागपुर शहरातील लक्ष्मी नगर, गांधीबाग, धतोली, धरमपेठ येते हे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात सफाई कामगारांची आरोग्य तपासणी त्यात बी.पी शुगर सह अनेक तपासण्या निशुल्क करण्यात आल्या. यावेळी या आरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने सफाई कर्मचारी आणि त्यांच्या नातलगांनी लाभ घेतला. यावेळी पावसाळ्यात कशी काळजी घेता येईल, स्वतःला आजारांपासून कसे दूर ठेवता येईल, याविषयीची माहिती या शिबिराद्वारे देण्यात आली.
या विशेष आरोग्य शिबीर डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. बहिरवार व डॉ. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. तसेच या शिबिरासाठी त्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. दरम्यान या शिबीराकरिता अनेकांनी मोलाचे सहकार्य केले. कामगारांप्रतीची काळजी या शिबिराद्वारे दिसून आली आहे. तसेच या अयोग्य शिबिरात पुढील प्रमाणे सूचना/माहिती ही देण्यात आली :
आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा, कुठेही पाणी साठू देऊ नका.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध उपचार करा.
ताप आल्यास रक्ताची चाचणी/तपासणी करा.
मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

