सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्हातील मालेगांव मधील श्री मालनेश्वर संस्थान येथे मागील 50 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्याची परंपरा आहे. त्यात हरिनाम सप्ताहात राज्यातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने आयोजित करण्यात आलेली आहे. ती आज पण कायम आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सोमवार दि. 4 सप्टेंबर रोजी सप्ताहाला प्रारंभ झाला. सुरू झालेल्या या हरिनाम सप्ताहात दररोज काकड आरती, गाथा पारायण, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच जागराचा कार्यक्रम होणार आहे. गाथा पारायण होणार आहे.
त्याअगोदर श्री. गणेश तोंडे यांनी पोथी डोक्यावर घेऊन मालेगांव शहरातील व इरळा येथील वारकऱ्यांनी टाळ मृदंग वाजवत मालेगांव शहरात मिरवणुक काढण्यात आली या नंतर वाचन ह.भ.प.संतोष महाराज भेंडेकर यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले.
4 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या या हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवार दि.11 सप्टेंबर रोजी करण्यात येणार असून, यावेळी सर्व भाविक भक्तासाठी भव्य महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

