संदीप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन नागपूर:- नागपुर शहरातील हुडकेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पिपळा- बेसा रोडवरील अथर्व नगरी येथील फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याने कामासाठी घरी आणलेल्या अल्पवयीन मुलीला घरात डांबून ठेवून घरकाम करून तिच्या छाती व गुप्तांगाला चटके देऊन तिला शारीरिक यातना दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका दाम्पत्याने गेल्या 4 वर्षापासून बालिकेचे लैंगिक शोषण करीत होते तिच्यावर अत्याचार केला. यात पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या नराधम आरोपीला पोलीस स्टेशन मध्ये व्हीआयपी सुख सोयी दिल्या जात असल्याने नागपुरकरात मोठ्या प्रमाणात संताप दिसून येत आहे.
12 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरात डांबून अमानुष अत्याचार करणाया जावई साळ्याला हुडकेश्वर पोलिसांकडून व्हीआयपी सुविधा मिळत असून दोघांनाही एखाद्या पाहुण्याप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध करून जात असल्याच्या आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तपासानुसार गेल्या ४ वर्षापासून आरोपी हे या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करीत होते.
या मुलीच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे या नराधम आरोपी तहा अरमान खान, अजहर खान आणि हिना खानने आई – वडिलांचा गरिबीचा फायदा उचलत आम्ही तुमच्या मुलीचे शिक्षण करू असे सांगण्यात आले होते, पात्र नागपूरला आल्यानंतर तहा अरमान खान, अजहर खान आणि हिना खानने तिच्यावर अत्याचार सुरू केले. हे आरोपी या मुलीकडून घरचे संपूर्ण काम करून घेत होती. तिच्याकडून लहानशी चूक झाली तरी सिगारेट, चाकू आणि तव्याचे चटके दिले जात होते. अरमानचा साळा अझहर विकृत प्रकृतीचा आहे. तो पीडीते वर अनैसर्गिक अत्याचार करीत होता. तिच्या शरीराचा विकास व्हावा म्हणून तिला इंजेक्शन आणि औषध दिले जात होते. या प्रकरणात सर्वप्रथम पोलिसांनी तहा याला अटक केली होती.
सोशल मीडियावर आरोपीचा फोटो वायरल होत आहे त्यात तो पोलीस अधिकाऱ्याच्या टेबल जवळ बसून मोबाईलवर बोलताना दिसत आहे. नागरिकांनी आरोप केला आहे की, आरोपी साठी हॉटेल आतून आवडीचे जेवण तसेच फिल्टर चे पाणी सुद्धा मागविण्यात येत आहे. दररोज त्याला भेटायला काही जण येतात. इतके संवेदनशील प्रकरण असतानाही आरोपी बाबत पोलीस सहानुभूती दाखवत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.
आरीपी कुटुंबाने बेंगलोर वरून विकत आणलेल्या 12 वर्षीय मुलीच्या गुप्तागाला सिगारेट चें टक्के देऊन पती आणि भाऊ लैंगिक शोषण करीत असल्याची माहिती हिना हिला होती, मात्र तिनेच मुलीला दम देऊन गप्पा राहुन त्याची मर्जी राखण्यासाठी तिला बाध्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिना आणि भाऊ अझहर शेख यांनी चौकीदाराला 50 हजार रुपये देऊन १२ वर्षीय मुलीला घर कामाकरिता विकत घेतले.

