पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पुमा कंपनीचा बनावट लोगो वापरुन ग्राहकांना कपड्यांची विक्री करुन फसवणूक केली जात असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर कोंढवा पोलिसांच्या पथकासह छापा मारुन लाखो रुपयांचे कपडे जप्त केले आहेत.
कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 5) कोंढवा खुर्द येथील जिजामाता कॉम्पलेक्स मधील रायबा फॉर मेन्स या दुकानात करण्यात आली.याबाबत कंपनीचे फिल्ड ऑफिसर महेंद्र सोहन सिंग (वय-36 रा. रसिका सोसायटी, कसबा पेठे पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल दिलीपराव पिसाळ (वय-28 रा.मोरे चाळ, कोंढवा खुर्द मुळ रा. मुपो व्याहळी कॉलनी ता. वाई, जि. सातारा) याच्यावर कॉपीराईट अॅक्ट कलम 63, 64, 65 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे आर.एन.ए.आय.पी एटोर्नी कंपनीचे फिल्ड ऑफिसर आहेत.
या कंपनीला पुण्यातील कोंढवा येथे पुमा या ब्रॅण्डेड कंपनीचा अधिकृत लोगो व नावाचा गैरवापर करुन कपड्यांची विक्री करण्यात येत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.त्यापार्श्वभूमीवर कोंढवा पोलिसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन जिजामाता कॉम्पलेक्स मधील रायबा फॉर मेन्स या दुकानात छापा टाकला. त्य पुमा या बँण्डेड कंपनीचा लोगो व नावाचा वापर करुन ट्रॅक पँट व टि शर्ट चा साठा करुन त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तीन लाख रुपये किमतीचे कंपनीच्या एकूण 300 ट्रॅक पॅन्ट व 1 लाख हजार रुपये किमतीचे पूमा कंपनीचे 225 नग टि शर्ट जप्त केले पोलिसांनी या कारवाईत 4 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त करुन दुकान मालक विशाल पिसाळ याच्यावर कॉपराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

