आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मोबाईल. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन दि. 7 सप्टेंबर :- रोजी सामाजिक भवन संत कबीर वार्ड हिंगणघाट येथे देशाच्या रक्षणासाठी शहीद झालेल्या विर शहीद जवान प्रकाश ढाले यांच्या 19 व्या पावन शहीद स्मृतीदिना निमित्त पॅरामिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट तहसील द्वारे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन श्री राजेंद्र बोकडे माजी सीआरपीएफ यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पांडुरंग धनवीज डेप्युटी कमांडंट माजी सीआरपीएफ निरिक्षक, श्री प्रभाकर पाटील माजी सीआरपीएफ तसेच पॅरामिलिटरी मित्रपरिवारचे अध्यक्ष श्री रवींद्र नोकरकर आणि शहीद प्रकाश ढाले मित्रपरिवार तर्फे श्री संजय काळे सह या कार्यक्रमाला संत कबीर वार्ड येथील शहिदांचे परिवारजन व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी शहीद प्रकाश ढाले यांच्या वडिलांना शाल श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले तसेच शहीद प्रकाश ढाले यांच्या पावन स्मृतीदिना निमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला. त्यानंतर सर्व उपस्थितानी राष्ट्रगान गाऊन कार्यक्रमाची सांगता केली.
या कार्यक्रमाला पॅरामिलिटरी मित्रपरिवार तर्फे, वसंत सुटे, सागर दाते, महादेव सहस्त्रबुद्धे, संजय कडू, रामू मुळे, रामेश्वर बोटरे, राजू सालवटकर, श्रीकांत फलके, अशोक थूल, विनोद देहारे, अरुण आत्राम, शंकर सहारे, दिलीप चालखुरे, अमोल पवार, नारायण वांढरे, राजू गुजरकर, प्रफुल दरवारे, देवानंद जंगले, विजय मुदाफळे, भारत फुलकर, दिलीप इंगोले, विजय वाघ, दिलीप नागोसे, अशोक खोडे, सुनील दिवे, विलास भोयर, गणी खान इत्यादी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

