दुसऱ्या दिवशी त्याच वाघिणीचा पुन्हा आणखी २ लोकांवर प्राणघातक हल्लाचा प्रयत्न.संपूर्ण गाव दहशतीच्या सावटाखाली वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा गावकरी पूर्णपणे बंदोबस्त करेल असा संताप व्यक्त.
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन समुद्रपूर:- तालुक्यातील ताडगाव येथील शेतकरी गोविंदा लहाणू चौधरी नेहमीप्रमाणे शेतात गेले असता अचानक झुडुपात लपलेल्या वाघिणीने हल्ला चढविला असता या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. ही दुःखद बातमी मिळताच प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी शेतकऱ्यांचा कुंटुबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी मृतकांचा मुलगा यांनी घडलेल्या प्रसंगाचा सर्व थरार यावेळी सांगितला.
लगेच पुन्हा दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता शेतामध्ये नेहमीप्रमाणे शेतातील काम करण्याकरिता गेले असता सौ.संगीता पुंडलिक चौधरी व पुंडलिंक चौधरी या दोन्ही पती-पत्नी वर वाघीनिने अचानक हल्ला केला या हल्ल्यातून दोघंही थोडक्यात बचावले. आणि दोघांनीही भित भित घर गाठल गावातील सर्व लोक एकत्रित आले. ही बातमी मिळताच त्याच क्षणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी त्वरित भेट घेऊन तात्काळ जिल्हाधिकारी श्री राहुलजी कर्डिले, वन विभागाचे (फॉरेस्ट) अधिकारी, उपविभागीय अधिकारी यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली, की त्या वाघीणींचा बंदोबस्त ताबडतोब लावण्यात यावा व मृत शेतकऱ्यांचा कुंटूबियांना वन विभागाच्या वतीने तात्काळ शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी केली. ताडगावच्या शेतकऱ्यामध्ये आजही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे व शासनाचे तात्काळ वाघिणीचा बंदोबस्त करावा नाही तर गावकरी बंदोबस्त करेल असा संताप गावकऱ्यानी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, सरपंच श्रीरामे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर, उपसरपंच मंगेश गिरडे, सुभाष चौधरी, प्रा. गोकुल टिपले, युवक जिल्हा महासचिव राजू मुडे, विद्यार्थी तालुका अध्यक्ष रविकिरण कुठे, उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

