वाघिणीचा तातडीने बंदोबस्त लावण्यासंबंधी सूचना.
वन विभागाकडून दहा लाखाची शासकीय मदत जाहीर
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट, ०६ सप्टेंबर:- ताडगाव ता.समुद्रपूर येथील शेतकरी गोविंदा चौधरी हे नेहमीप्रमाणे बैल घेऊन शेतात गेले असता झुडपात लपून असलेल्या पट्टेदार वाघिणीने हल्ला चढवून जागीच ठार केले. हि दुःखद माहिती मिळताच माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले.
त्याप्रसंगी माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी आजूबाजूच्या गावातील लोकांकडून माहिती घेतली असता या पट्टेदार वाघिणीने या आठ दिवसामध्ये २-४ लोकांवर हल्ला केला असल्याची माहिती मिळतात माजी आमदार तिमांडे यांनी वन अधिकारी गावंडे यांच्याशी संवाद साधून पट्टेदार वाघिणीचा तातडीने बंदोबस्त करण्यासंबंधी सूचना दिल्या.
त्यावेळी मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांला वन विभागाच्या वतीने दहा लाख रुपयाची शासकीय मदत देण्यात आली आहे. त्यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

