मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि. ८ सप्टेंबर:- रोज सोमवार ला उपविभागीय कार्यालय हिंगणघाट येथे उप विभागीय अधिकारी सोनाली सोनुने यांना शिवसेना (ठाकरे) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नगर परिषदच्या चुकीच्या धोरणामुळे हिंगणघाट शहराच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे वंचित आघाडीचे नेते अशोक रामटेके, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे शि.से, माजी अध्यक्ष न. प. हि चे सुरेश मुंजेवार, युवा सेना जिल्हा प्रमुख अभिनंदन मुनोत, जिल्हा उपाध्यक्ष वं.ब.आघाडीचे कुणाल वासेकर, तालुका प्रमुख सतीश धोबे शि.से, शहर प्रमुख सतीश ढोमने शि.से, तालुका अध्यक्ष अशोक भाले वं. ब. आघाडी, शहर अध्यक्ष रमेश घोडे वं.ब आघाडी, जेष्ठ नगर सेवक मनीष देवडे, युवासेना समन्वयक प्रकाश घोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
या वेळेस केन्द्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर शिव सेना आणि वंचित बहुजन आघाडी कडून “होऊ दया चर्चा “च्या माध्यमातून निवेदनात म्हटले आहे कि, १) सन २०१२-१३ च्या चुकीच्या मूल्यांकन(असिसमेंट)च्या विरोधात शहरातील काही मंडळींनी उच्च न्यायालयात आक्षेप घेतला त्या वेळेस उच्च न्यायालयाने आदेश दिला कि सन २००६-०७ च्या मूल्यांकन(असिसमेन्ट) च्या नुसार मालमत्ता कर आकारणी नगर परिषद नी घ्यावी पण नगर परिषद ने या आदेशाला डावलून मनमानी करून कर आकारणी जनते कडून वसूल करून घेतली.त्यावर आपण सकल चौकशी करून उच्च न्यायालयाचे आदेश मागून योग्य कार्यवाही करण्यास सांगा.
२) त्याच प्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनासाठी २०१५-१६ साली शहरातील घरकुलसाठी जवळपास ३००० हजार लोकांनी अर्ज केले, त्यापैकी १८४५ लोकांचे अर्ज मंजूर झाले त्यातून ६०१ लोकांनी घरकुल करण्यास काही अडचणी मुळे नकार दिले पण उर्वरित १२४४ मंजूर झाले ले घरकुल धारकाला आज पर्यंत तिसरा ९००००/- हजार रुपयांचा टप्पा नगर परिषदने चार पाच वर्षांपासून दिले नाही. लाभार्ती जेव्हा नगर परिषद ला तिसऱ्या रक्कम बाबत विचारणा केल्यावर योग्य उत्तर मिळत नाही आणि निधी येईल तेव्हा सांगण्यात येईल. आज या लाभार्ती लोकांनी दुसऱ्या कडून व्याजाने पैसे आणून उर्वरित काम केले आहे.हे पैसे उशिरा येईपर्यंत वर्तमानामध्ये या घरकुल च्या लोकांना व्याजाचे पैसे देणे कठीण झाले आहे. या महागाई च्या काळात घर चालविणे अतिशय कठीण झाले आहे म्हणून या लोकांचे तिसरा टप्पा लवकरात लवकर मिळावा यासाठी शासनाकडून पाठपुरावा आपल्या माध्यमातून करून निधी मिळून द्यावे अन्यथा या लोकांनसाठी नगर परिषद हिंगणघाटच्या प्रशासनाच्या विरोधात धारण्यावर बसण्याची शिव सेना आणि वंचित बहुजन आघाडी तयारी राहील.
३)जेव्हा पासून नगर परिषदवर प्रशासन लागले तेव्हा पासून नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत असल्याचे दिसून आले आहे. या शहरातील जनतेच्या आरोग्या बाबत चिंता नाही आजची परिस्थिती अशी आहे कि डेंग्यू, मलेरिया चे मोठया प्रमाणावर रुग्ण संख्या वाळली आहे. शहरातील विविध वार्डातील नाल्याची सफाई बरोबर नाही, कचरा नियमित उचल्या जात नाही, माजी नगरसेवकानी व सामान्य लोकांनी सूचना दिल्या तरी त्यांचे ऐकून घ्यायचे नाही असे ठहरून काम करीत नाही. जाण बुजून बि. जे .पी च्या लोकांना सोडून विरोधी लोकांचे काम करायचे नाही असे दुराभाव नगर परिषद कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत आहे.शेवटी जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे या बाबत आपण नगर परिषदला या संदर्भात पत्र पाठवून लवकरात लवकर कार्यवाही साठी पाऊल उचलायाला लावा.
४)त्याच प्रमाणे या शहरात मोठया प्रमाणावर चोरी, घर फोडी, भर दुपारी दुकानातून पैसे हिसकावून घेऊन जाणे, दिवस रात्री रेतीचे मोठया प्रमाणावर चोरी व वाहतूक करणे, दारू, गांजा व इतर नशेची वस्तू मोठया प्रमाणावर वाहतूक करणे व विकणे चालू आहे. समाज कंटक लोकांच्या कडून झगडे, मार जोड, मुलीची छेडखाणी करणे इत्यादी चे प्रमाण CCTV कॅमेरा बंद असल्यामुळे मोठया प्रमाणावर वाढले आहे.या संदर्भात शहरातील विविध संघटनेने एक वर्षा पूर्वी पोलीस विभागाला तसेच उप विभागीय कार्यालया कडे निवेदन दिले. त्या वेळेस स्थानिक आमदारांनी स्वतः आणि आपण( उप विभागीय अधिकारी) यांनी मिटिंग घेऊन योजना आखली,त्या वेळी आपण सर्व मंडळींनी शहरातील अतिरिक्त CCTV कॅमेरा आणि त्याचा संपूर्ण साहित्य चा अंदाजपत्रक तयार करून जिल्हा नियोजन समिती कडून निधी मंजूर करून लोकांच्या सुरक्षेसाठी उपयोगात आणू असे वृत्तपत्रात बातमी दिली त्याचे काय झाले. आम्हाला स्थानिक लोकप्रतिनिधी वर विश्वास नाही म्हणून उप विभागीय अधिकारी च्या माध्यमातून शासनाकडे या बाबत मागणी करून मंजूरी घेऊन लवकरात लवकर जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने CCTV कॅमेरा आणि संच लावून सुरू करावे.
या सर्व मागणी बाबत नगर परिषद, पोलीस विभाग आणि आपण दाखल घ्यावी अन्यथा शिव सेना ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. पुढे होणाऱ्या अडचणीसाठी प्रशासन जवाबदार राहील असे निवेदनातुन म्हटले आहे. हे निवेदन देतांना नगर सेवक शंकर मोहमारे, भास्कर ठवरे, युवा सेना शहर प्रमुख भूषण कापकर, नगर सेवक मनोज वरघणे, जेष्ठ शिव सैनिक सुनील आष्टीकर, रवी कांबळे युवक अध्यक्ष वं. ब. आघाडी, शहर संघटक गजानन काटवले, मनोज मिसाळ, उप शहर प्रमुख संजय पिंपळकर, नरेंद्र गुळकरी, लक्ष्मण बकाने, शंकर झाडे, विभाग प्रमुख मोहन तुमराम, रुपेश काटकर, नितीन वैद्य, सचिन मुडे, गौरव गाडेकर, सुरेश चौधरी, दिलीप चौधरी, संतोष चौधरी, दिनेश धोबे, भास्कर मानकर, विनोद घोडघाटे, गोवर्धन शाहू, दिलीप वैद्य, अजय डांगरे, बंडू लाखे, विजय कोरडे, प्रशांत आवारी, चंदू भुते, हिरामण आवारी, अनंता गलांडे, बलराज डेकाटे, भास्कर भिसे, आशिष जैस्वाल,लोमेश बोबडे, ललित धनविज, प्रशांत कांबळे, योगेश कामडी, ईश्वर चंदनखेडे, अशोक तपासे, राहुल फुलकर, सुरेश बुरुड, आनंद जनबंधु, अनंता सोरटे, गौतम वाघमारे, पावन भगत, प्रशांत मांडावे, सुनील सोघे, स्वप्नील येसंबरे, विशाल कुंभारे, मूनाफ शेख,सुरेश कामडी, नारायण कुंभारे, मयूर धाबर्डे, मनोज सावंत, उत्कर्ष तालेवार, आशिष भांडे, आशु भगत, श्रीकृष्ण रामगडे, प्रशांत कंनाक्के, मोहन जाधव, आशिष पेंदाम, विक्की गायकवाड, नारायण वर्मा सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

