रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर :- तालुक्यातील श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल मधील मुलांनी राधा-कृष्णाची वेशभूषा करून त्यांनी ‘गोविंद बोलो, हरी गोपाल बोलो…’ गाण्यावर ठेका धरला. बालगोपालांनी मनोरे रचून जल्लोषात दहीहंडी फोडून प्रसादाचे वाटप केले.गोप- गोपिकांच्या वेशभूषेत विद्यार्थी खूप सुंदर दिसत होते.बालगोपालांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल येथे आयोजित कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अभय कुमार काळुंके उपस्थित होते. संस्थेच्या सचिव मीनाक्षी काळुंके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मार्गदर्शनामध्ये त्या म्हणाल्या की हिंदू पौराणिक कथेनुसार, श्रीकृष्णांना लहानपणी पांढरे लोणी, दही आणि दूध खायला खूप आवडत होते. त्यासाठी श्रीकृष्ण स्वतःच्या घरातून, मित्रांसह शेजारी व इतर ग्रामस्थांकडूनही दही, दूध, लोणी चोरून आणत असत. त्यामुळे त्यांची अजूनही काही नावं पडली. जशी की, “नवनीत चोर” किंवा “माखन चोर” असेही म्हणतात. मुलांमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेतला जातो. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका लंका भवर, शिक्षक वृंदामध्ये पी.पी मगर, पी .एस .गायकवाड, पी. आर.पहाडे, एस. एस. खालापुरे, ए.जी.चंदने, एस. एस .मुंडे, बी .आर .पवार, एस.पी. बिलारे, एम .एस. व्यवहारे, एस.आर . पाईकराव, इतर कर्मचारी कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

