✒️मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील नगर पालिका प्रशासना मार्फत चालवण्यात येणाऱ्या जीबीएमएम ज्युनिअर कॉलेज प्रशासनाचा शिक्षण विभागात गैरकारभाराचे दिवसेंदिवस नवनवीन प्रताप समोर येत आहे. त्या अनुषंगाने गतकाळात नियमांना फाटा देत जनतेचे पैशाची सर्हास लूट माजवली आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासन आणि शाळा प्रशासन यांच्यावर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
शिक्षक भरती प्रक्रिया राबवून नगर पालिका प्रशासनाने शासनाने आकुन दिलेल्या नियमांना फाटा देत मनमर्जी पद्धतीने शासनाच्या आणि नागरिकांच्या पैशाची लूट करून खाजगी शिक्षकावर मोठ्या प्रमाणात उधळीत नागरीकाची फसवणूक केली. यात कोनाकोनाचे आर्थिक हितसंबंध जुळले होते याची शहानिशा शिक्षण विभागाने सविस्तर तपास करून दोषी नगर पालिका प्रशासन व शिक्षण विभागावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहरातील काही शिक्षकांनी केली आहे.
हिंगणघाट शहरातील जीबीएमएम ज्युनिअर कॉलेज येथे काही विषयासाठी तासिका तत्वावर शिक्षक सेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. यात शासनाच्या विविध नियमांना डावलून संबंधितांना आर्थिक लाभ नगर पालिका शिक्षण विभागाने दिले आहे. येथिल तासिका तत्वावर कार्यरत मराठी विषयासाठी संतोष आंबटकर यांना नियमबाह्यपणे आर्थिक लाभ पोहचवण्यासाठी त्यांना जास्तीच्या अतिरिक्त तासिका दाखवुन विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणार्या निधीची लूट जीबीएमएम ज्युनिअर कॉलेज हिंगनघाट कार्यालय मार्फत गेल्या अनेक वर्षापासून सूरु आहे. हे खालील बाबींवरून लक्षात येते.
१) ज्याअर्थी माहे डिसेंबर 2021 मध्ये शिक्षक संतोष आंबटकर यांना 22 कार्य दिवसाच्या 271 तासिका दाखविण्यात आल्या व त्यानुसार त्याना 22583 रूपये वेतन अदा करण्यात आले. प्रतिदिन त्यांच्या तासिकांची संख्या 12.39 (271+22) भरते, त्याअर्थी शाळेतील एका दिवशीच्या कमाल तासिकांची संख्या 9 असताना ते एका दिवशी 12.31 तासिका कसे काय घेऊ शकतात? माहे नोव्हेंबर 2021 तसेच जानेवारी 2022 व इतर अनेक महिन्यामध्ये अश्याच प्रकारचा घोळ आढळून येतो.
शाळेचे सत्र 2022 ते 23 मध्ये 11 व्या वर्गात मराठी विषय घेतलेल्या एकुण विद्यार्थांची संख्या 78 होती ते एकाच वर्गात दाखवायला हवे होते तसेच वर्ग 12 वी चे विद्यार्थ्यांची एकूण संख्या 66 असुन तेही एकाच वर्गात दाखवायला हवे होते, पण जीबीएमएम कॉलेज प्रशासनाच्या वतीने असे नकरता ते वर्ग 11 वी 78 विद्यार्थ्यासाठी चे 3 तुकड्या निर्माण केल्या व 12 वी विद्यार्थ्यानसाठी 3 तुकड्यामध्ये विभाजित करून शिक्षक आंबटकर यांना उपलब्ध होणार्या 12 तासिका ऐवजी 30 तासिका दाखविण्यासाठी अतिरिक्त 4 तुकड्यां मध्ये विद्यार्थी दाखविण्यात येउन विशेष लाभ पोहचवण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणार्या निधीची लूट केली आहे.
आर्थिक काटकसरिच्या बाबतित शासकीय धोरणाचा अवलंब नकरता हिंगणघाट नगर पालिका व जीबीएमएम कॉलेज प्रशासनाने नियमबाह्यपणे विद्यार्थ्यांकडून प्राप्त होणार्या निधीची लूट मागील काही वर्षांपासुन राजरोसपणे सुरु असुन आर्थिक अपहार केल्या जात आहे.
जीबीएमएम कॉलेज मध्ये सुरू असलेल्या भष्ट्राचाराची शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करून यात समितीच्या चौकशीत दोषी आढळणाऱ्या नगर पालिका प्रशासन अधिकारी व कॉलेज प्रशासनावर कारवाई करून विद्यार्थ्यांकडुन प्राप्त निधिची लूट थाबवीण्यात यावी अशी मागणी शहरतील शिक्षक व विद्यार्थांनी केली आहे.
… क्रमशः…
हिंगणघाट नगर पालिकेच्या शाळेत शिक्षक भरतीत घोटाळा, भाग -4 वाचा पुढील अंकात…
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

