Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

नागपुर: मराठ्याना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, कुणबी व ओबीसी आंदोलन कृती समितीचे संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 10, 2023
in आंदोलन, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर: मराठ्याना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ नये, कुणबी व ओबीसी आंदोलन कृती समितीचे संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- राज्यात मराठा आरक्षण पेटले आहे. जालना जिल्हात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यावर पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने हे आंदोलन अजून पेटले आहे. त्यात आता नागपूरात संविधान चौकात कुणबी आणि ओबिसी समाज पण बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

कुणबी आणि ओबीसी आंदोलन कृती समितीच्या वतीने मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास कुणबींसह इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाने कडाडून विरोध केला आहे. काहीही झाले तरी ही मागणी सरकारने मान्य करू नये,असा इशाराही देण्यात आला आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील हे मागील अनेक दिवसापासून आंदोलन करत आहे. त्यांनी सरकारला अशी मागणी केली की मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे. आता या मागणीला जोरदार विरोध दर्शवण्यात येत आहे. त्यामुळे शाखीय कुणबी ओबीसी आंदोलन कृती समितीच्यावतीने रविवारपासून संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. पहिल्याच दिवशी आंदोलनात मोठ्या संख्येने कुणबी समाजाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. दरम्यान काँग्रेस नेते व विरोधीपक्ष नेते विजय वड्डेट्टीवार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ओबीसीं समाजाच्या आंदोलनाला पाठिबा जाहीर केला आहे तसच मराठा समाजाला सरसकट कुणबीजातीचे प्रमाणपत्र देण्यास आपला विरोध असल्याचे स्पष्ट करीत सरकारने असा निर्णय घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. वडेट्टीवार हे आंदोलनस्थळी व्यासपीठावर बसले नव्हते. याबाबत त्यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हे आंदोलन राजकीय नाही, ओबीसी समाजाचे आंदोलन आहे, त्यामुळे मी जनतेसोबत बसलो आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते प्रा. बबनराव तायवाडेही यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, कुणबी हा ओबीसीमधील एक घटक आहे. त्यामुळे समाज त्यांच्या पाठीशी आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास आमचा विरोध आहे. सरकारने जरांगे यांची ही मागणी मान्य करू नये, मराठ्यांना वेगळे आरक्षण द्यावे, ओबीसींमधून त्यांना देऊ नये, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.पहिल्या दिवशी आंदोलनात सर्वपक्षीय कुणबी नेते आंदोलनात सहभागी झाले होते.

आंदोलनाच्या माध्यमातून शासनाकडे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, परराज्यातील लोकांना कुठल्याही कागदपत्राच्या आधारे महाराष्ट्रातील जात प्रमाणपत्र देऊ नये, जातीनिहाय जनगणन करा, ओबीसींना ५२ टक्के आरक्षण द्या, केंद्राने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी याही मागणी आदी मागण्या आंदोलकर्त्यांच्या आहेत.

Previous Post

चंद्रपूर: मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र दिल्यास संपूर्ण तेली समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.

Next Post

अकोला: 23 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास, 16 महिन्यांचा मुलगा आई वीणा पोरका.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला: 23 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास, 16 महिन्यांचा मुलगा आई वीणा पोरका.

अकोला: 23 वर्षीय विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास, 16 महिन्यांचा मुलगा आई वीणा पोरका.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In