उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- समता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर लोणार विधानसभा मतदार संघासाठी आमदारकीचे तिकिट संदिप गवई यांना जाहीर करण्यात आले.
कल्याण येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी समता पार्टीला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाहीर पाठिंबा दिला आहे. कल्याण समता पक्षाच्या कार्यालयामध्ये तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक संदीप गवई व त्यांचे कार्यकर्ते यांनी समता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तृणेश देवळेकर यांची भेट घेऊन समता पक्षाला जाहीर पाठिंबा दिला आहे. याप्रसंगी एडव्हकेट देवकांत मेश्राम यांना समता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष (कायदे विभाग) या पदी नियुक्ती करण्यात आली. तसेच सौ.निशा सोनवणे यांची महिला आघाडी मुंबई अध्यक्ष तर कुणाल माने यांची विदर्भ विभाग अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी तथागत ग्रुपचे संस्थापक संदीप गवई, महाराष्ट्र सल्लागार देवकांत मेश्राम, तथागत ग्रुप मराठवाडा अध्यक्ष संतोष खरात, महाराष्ट्र सचिव राधेशाम खरात, औरंगाबाद जिल्हा अंकुश हिवाळे, कुणाल माने, महिला आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा निशा सोनावणे, शिराळा तालुका अध्यक्ष मिराताई कांबळे, संघमित्रा एटम, सिंधू एटम, मनिषा देसाई, श्र्वेता भालेराव आदी तथागत ग्रुपचे समस्त पदाधिकारी व सदस्य व महिला आघाडी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

