ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जळगाव: जिल्हातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. पहिलेच दोन मुली त्यात आणखी तिसरीही मुलगी झाल्याने नराधम बापाने आपल्याच 8 दिवसांच्या चिमुरड्या मुलीच्या तोंडात तंबाखू घालून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर या नराधमाने परस्पर मृतदेहाची विल्हेवाट पण लावली. आशा सेविकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. हा प्रकार जळगाव जिल्हातील जामनेर तालक्यातील हरिनगर तांडा येथे रविवारी घडला. गोकुळ गोटीराम जाधव वय 30 वर्ष असे या नराधम बापाचे नाव आहे.
आरोग्य विभागच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, वाकोदजवळ हरिनगर तांडा ता. जामनेर येथील रहिवासी गोकुळ जाधव याला अगोदरच दोन मुली आहेत. दिनांक 2 सप्टेंबर रोजी त्याचा पत्नीला वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आली. रविवार, 10 रोजी चिमुरडीची गोकुळने हत्या केली.
अशी झाली घटना उघड : आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती. त्यामुळे तिचा आरोपी बापावर संशय आल्याने आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांनी मंगळवारी गाव गाठून माहिती घेतली. यावेळी त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने चिमुरडीला मारल्याची कबुली दिली. गोकुळने रविवारी चिमुरडीच्या तोंडात तंबाखू घातला. तिला झोळीत झोपविले. यात तिचा मृत्यू झाला. रात्री चिमुरडीचा मृतदेह फर्दापूर ते वाकोद रस्त्यावर खड्डा खोदून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे आरोग्य पथकाच्या तपासात निष्पन्न झाले आहे. रात्री उशिरापर्यंत गोकुळ जाधवविरुद्ध आपल्याच मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

