राजेंद्र झाडे, चंद्रपूर उपजिल्हा प्रतीनीधी
मो नंबर 9518368177
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- श्री क्षेत्र धाबा येथे दरवर्षीप्रमाणे श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थानचे वतीने संपूर्ण श्रावण महिनाभर सर्वांचे श्रद्धास्थान, आराध्य दैवत श्री संत शिरोमणी परमहंस कोंडय्या महाराज यांचे पवित्र समाधीवर व शिवलिंगपिंडीवर दररोज सकाळी ७.३० ते ९.३० पावेतो अभिषेक होत असतो व या कार्यक्रमाची सांगता (समारोप) आज दिनांक १३/०९/२०२३ रोज बुधवारला झाला .
श्री शेगमवार महाराज, श्री राजमोली स्वामी महाराज यांनी विधिवत पूजा विधिने सकाळी 9 वाजता रुद्राभिषेक करण्यात आला हस्ते संस्थानचे अध्यक्ष श्री अमर बोडलावार सपत्नीक त्यानंतर सामूहिक अभिषेक बिलवार्चन झाला आणि श्री संत कोंडय्या महाराजांना सहस्त्र बिल्वार्चनाने आच्छादित करून सामूहिक आरती झाली आरती नंतर प्रसाद व महाप्रसादाचा भाविक भक्तांनी लाभ घेतला.
यावेळी संस्थानचे सर्व विश्वस्त मंडळ, संत नगरीतील भक्तगन, तेलंगणा, आंध्रप्रदेश, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर येथील सुद्धा भाविक भक्त मंडळी या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद प्राप्त करून घेतला.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

