बाप्पा च्या स्वागतासाठी चिखलाचे साम्राज्य…
नितेश पत्रकार यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. 7620029220
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वणी:- तालुक्यातील ग्रामपंचायत पिल्की वाढोणा (पठारपूर) गावामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य व साथीच्या आजाराचे थैमान सुरू असताना आजपर्यंत ग्रामपंचायतच्या वतीने कुठलीही जंतुनाशक कीटकनाशक धूर फवारणी न केल्याने सर्वत्र डासांचे साम्राज्य झाल्याचे पाहायला मिळते यामुळे मानवी आरोग्य धोक्यात येत असताना सुद्धा संबंधित ग्रामपंचायत याकडे डोळे झाक करून बघ्याची भूमिका घेताना पाहायला मिळते.
सध्या पावसाचे दिवस चालू असल्याने अनेक रोग पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पावसाळ्याच्या तोंडावर नाल्या गटारांची स्वच्छता आणि पावसाळ्यात नियमित धूर फवारणी हे नागरी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते साहजिकच ही जबाबदारी ग्रामपंचायत यांची असते. परंतु पिल्की वाढोणा( पठारपूर) ला विसर पडला की काय ?
पावसाळा सुरू होऊन एक- दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी ग्रामपंचायत प्रशासनाला धूर फवारणीचा मुहूर्त सापडलेला दिसत नाही. की ग्रामपंचायत हेतू पुरस्कार या बाबीकडे दुर्लक्ष तर करत नसेल ना अशी खमंग चर्चा ग्रामस्थातून होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे त्यासोबतच पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी जमा होत असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे यासोबतच पावसाळ्यात ठिकठिकाणी सांडपाणी जमा होत असल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते अशावेळी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी धूर फवारणी करणे गरजेचे असते नागरी आरोग्य अबाधित राहावे यासाठी ग्रामपंचायतने नियमित ही कामे करायची असतात मात्र या कामाचां सध्या ग्रामपंचायतला विसर पडल्याचे दिसून येत आहे. सदर गावाचा वाढता विस्तार वाढत असल्याने गावात घाणीचे साम्राज्य वाढत आहे त्याचं घाणीमुळे डास तयार होत असल्याकारणाने गावात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे त्यामुळे फागिंग मशीनद्वारे केली जाणारी धूर फवारणी होत नसून डासांचा प्रचंड प्रकोप वाढला असून गावात स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

