पंकेश जाधव पुणे ब्युरो चिफ 7020794626
हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- दिनांक १७/०९/२०२३ रोजी रात्री १० ०० वाचे सुमारास सार्वजनिक शौचालयाच्यावर, सर्वे नं. १५२ ए, मिरेकर बस्ती, हडपसर, पुणे या ठिकाणी मयत स्वप्नील विठ्ठल झोंबार्ड वय १७ वर्षे यास आरोपी सनि रावसाहेब कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे, जय येरवळे, तौफिक शेख व शाहरुख शेख यांनी संगनमत करुन पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन त्यांच्याकडील धारदार लोखंडी हत्यारांनी स्वप्नील याच्या डोक्यावर वार करुन त्यास जिवे ठार केले तसेच आरोपी यांनी त्यांच्या कडील लोखंडी धारदार हत्यारे हवेत फिरवुन परीसरात दहशत पसरवली. त्याबाबत हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं १४०६ / २०२३ भादंवि कलम ३०२,३४ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४.२५ सह क्रिमिनल लॉ अॅमेंडमेंट अॅक्ट ३ व ७ प्रमाणे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यातील आरोपी सनि रावसाहेब कांबळे, अमन शेख, आकाश कांबळे, जय येरवळे, तौफिक शेख व शाहरुख शेख यांचे बाबत तपासपथकातील अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे व अंमलदार यांनी माहीती घेतली असता, ते गुन्हा झालेनंतर फरार झाले होते. आरोपींबाबत उपयुक्त माहीती गोळा करून आरोपींचा पाठलाग गंजपेठ, स्वारगेट व परत हडपसर असा करत आरोपी १) आकाश हनुमंत कांबळे वय २३ वर्ष रा. मिरेकर वस्ती हडपसर पुणे व इतर ३ विधीसंघर्षित बालक यांना हडपसर भागातून ताब्यात घेतले. आरोपींना हडपसर पोलीस ठाणेस घेवून येवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी मयत स्वप्नील विठ्ठल झोंबार्डे याचेबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून खुन केला असल्याचे सांगीतले. पुढील तपास प्रमोद दोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षकbहडपसर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. सह पोलीस आयुक्त सो, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा साो, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. रविंद्र शेळके साो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. संदीप शिवले सो पोनि (गुन्हे), श्री. विश्वास डगळे सगो, पोनि (गुन्हे), यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, कुंडलीक केसकर, रशिद शेख, प्रशांत टोणपे, अनिरूध्द सोनवणे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे…

