Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पुणे: पेईंग गेस्ट म्हणुन राहुन रुममेटचे लॅपटॉप व मोबाईल फोन चोरणा-या भामटयास नागपुर येथून अटक, भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 3, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
पुणे: पेईंग गेस्ट म्हणुन राहुन रुममेटचे लॅपटॉप व मोबाईल फोन चोरणा-या भामटयास नागपुर येथून अटक, भारती विद्यापीठ पोलीसांची कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दशरथ गायकवाड पुणे प्रतिनिधी

पुणे:- भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहरच्या हद्दीत पेईंग गेस्ट म्हणुन राहुन रुममेटचे लॅपटॉप व मोबाईल फोन चोरणा-या भामटयास भारती विद्यापीठ पोलीसांनी नागपुर येथून अटक करुन त्याचेकडुन चोरीचे गुन्हे उघडकीस आला.

दिनांक 28 ऑगस्ट ला रात्री 01 वा. चे सकाळी 05.45 वाजताचे दरम्यान फलॅट नं 1, सिक्स पॉकेट बिल्डींग, येनपुरे नगर, भारती विद्यापीठ, पुणे येथून श्री. हरीश पोपट काळे वय 23 वर्षे, व्यवसाय नोकरी / शिक्षण, रा. फलॅट नं 1, सिक्स पॉकेट बिल्डींग, येनपुरे नगर, भारती विद्यापीठ, पुणे यांचा व त्यांचे मित्रांचा एक लॅपटॉप व दोन मोबाईल फोन आरोपी अनुराग राजेश ठाकूर वय 20 वर्षे रा. अंबाझरी हिलटॉप, अॅटो स्टैंड हिलटॉप, 1354, अजयनगर, युनिव्हर्सिटी कॅम्पस, नागपूर याने चोरून नेले आहे म्हणून दिलेल्या फिर्यादी वरुन भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजि नंबर 428 / 2022 भादंवि कलम 380 अन्वये गुन्हा दाखल आहे.

दाखल गुन्हयातील आरोपी अनुराग ठाकुर याचा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील पोलीस अधिकारी धिरज गुप्ता व पोलीस अंमलदार हे शोध घेत असताना पोलीस अंमलदार हर्षल शिंदे, धनाजी धोत्रे, राहुल तांबे यांना आरोपी नागपुर, मेडीकल चौक, ट्रीलीयम मॉल येथील एजंट जॅकबार मध्ये कामास असल्याची खात्रीशीर माहीती मिळाल्याने मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जगन्नाथ कळसकर यांनी सदर आरोपीताचा शोध घेणेकरता पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे, अभिजीत जाधव, सचिन गाडे यांना नागपुर येथे रवाना केले होते. त्यानुसार त्यांनी नागपुर येथे जावुन आरोपी अनुराग राजेश ठाकुर याचा ट्रीलीयम मॉल येथील एजंट जॅकबार मध्ये जावुन शोध घेतला असता तो मिळुन आल्याने त्यास दिनांक 29 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली आहे.

आरोपी अनुराग ठाकुर याचेकडे पोलीस कस्टडी दरम्यान पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, व पोलीस अंमलदार नरेंद्र महांगरे यांनी तपास करता त्याने कोथरुड पोलीस स्टेशन, सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीत मागील सहा महीन्यापासुन पेईंग गेस्ट म्हणुन राहुन रुममेटचे लॅपटॉप, मोबाईल फोन, पैसे चोरी केल्याचे व मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीतील डोमीनोज पिझ्झा यामध्ये काम करुन तेथील पैसे चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन त्याचेकडुन एक लॅपटॉप व एक मोबाईल फोन असे एकुण 40 हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास चालु असुन आरोपीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई मा.श्री. राजेंद्र डहाळे अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, मा. श्री.सागर पाटील पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ श्रीमती सुषमा चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनकडील श्री. जगन्नाथ कळसकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व श्रीमती संगीता यादव, श्री. विजय पुराणिक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), पोलीस उप निरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार नरेंद्र (अण्णा) महांगरे, हर्षल शिंदे, अभिजीत जाधव, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, राहुल तांबे, सचिन गाडे, अवधुत जमदाडे, मंगेश बोरडे, तुळशीराम टेंभुर्णे यांच्या पथकाने केली आहे..

Previous Post

पुणे: शिवाजीनगर पोलीसांनी वाहनचोरीचा गुन्हा 24 तासात केला उघड. वाहन चोराला अटक.

Next Post

गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड 84 मोबाईल फोन जप्त, सिहंगड रोड पोलीसांची कारवाई.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड 84 मोबाईल फोन जप्त, सिहंगड रोड पोलीसांची कारवाई.

गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड 84 मोबाईल फोन जप्त, सिहंगड रोड पोलीसांची कारवाई.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In