🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन समुद्रपुर:- पोलीस स्टेशन समुद्रपूर चे ठाणेदार एस. बी. शेगांवकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो.उप. नी. अनिल देरकर, डि.बी. पथकाचे पो.हवा. अरविंद येनुरकर, पो. ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे, सचिन वाघमारे व गृहरक्षक दलाचे ताराचंद नौकरकार, योगेश चौधरी, हार्दिक जोगे, पंकज फुलझेले, प्रेमचंद नगराळे, चंद्रकांत जांगळेकर, मारोती डहाके यांनी गणपती बंदोबस्त दरम्यान समुद्रपूर पोलीस स्टेशन परीसरातील गव्हा कोल्ही पारधी बेडा येथे दि. 20 सप्टेंबर रोजी प्रभावी वॉशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान पारधी बेड्यालगत असलेल्या झुडपी शिवारातून 43 प्लास्टीक व लोखंडी ड्रममधील 2,750 लीटर मोहा सडवा रसायण, 60 किलो गुळ भट्टी साहित्य असा जु.किं. 1,59,200 रू. चा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला. सदर मोहिमेदरम्यान आरोपी नामे 1 ) विनोद उर्फ उनील चतुर राउत, 2 ) माणीक गणपत पवार, दोन्ही रा.गणेशपूर पारधी बेडा, तह. समुद्रपूर यांचेवर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक नुरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन समुद्रपूरचे ठाणेदार सपोनि एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे, पो.उप.नी. अनिल देरकर, पो.हवा. अरविंद येनुरकर, पो.ना. रवि पुरोहित, राजेश शेंडे, पो.अं. वैभव चरडे, रोशन उईके व गृहरक्षक दलाचे ताराचंद नौकरकार, योगेश चौधरी, हार्दिक जोगे, पंकज फुलझेले, प्रेमचंद नगराळे, चंद्रकांत जांगळेकर, मारोती डहाके यांनी केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

