संदिप सुरडकर, नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर: तहसील पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सिटी नं.१६४ नगर भूमापन क्र.१३८, मौजा नागपूर, मोमीनपुरा स्थित सण १९१४-१५ पासून मालगुजारी असल्याचे पुरावे जमीन मालकाकडे आहे. त्यामुळे पटवारी रेकॉर्ड, नगर भूमापन रेकॉर्ड, महानगर पालिका रेकॉर्ड, यानुसार वडिलोपार्जित असल्याची नोंद आहे. त्यामुळे वारसाने हक्काने नगर भूमापन रेकॉर्डवर मो शकील वल्द सुलेमान शा यांचे दर्ज आहे. त्यानुसार नागपूर महानगर पालिकेच्या तर पावतीवर नाव दर्ज आहे.
लक्षात घेणे योग्य बाब अशी आहे की या जमिनीशी संबंधित नसलेल्या लोकांची 27 ते 28 मार्च 2023 रोजी भूमापन कर्मचारी जमीनी ची मोजणी करण्यास आले असताना त्यांना भिड एकत्रित करून त्यांच्या शासकीय कार्यात अडथळा निर्माण करून जमीन मोजणी करण्यापासून मज्जाव केला त्यामुळे त्यांना रिकाम्या हाताने फक्त पंचनामा करून परत जावे लागले. परंतु पुन्हा अर्जदाराने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन दि.21 व 22 जून 2023 रोजी मोजणी स्थळी पोहोचण्यास पुन्हा जमीन हडपणाऱ्या लोकांच्या आतंकसमोर पोलीस प्रशासन असताना सुद्धा मोजणी होऊ शकली नाही. पंचनामा करून नगर भूमापन परत गेले.
दि,21 जून 2023 ला पोलिसांनी नगर भूमापन कार्यालयाला समोरची मोजणीची तारीख घेण्याकरिता पत्र देऊन वेळ मागितला. तसेच मोजणीस मज्जाव करणाऱ्या लोकांना वरिष्ठ पोलीस निरीक्षकानी आक्षेप असल्यास कागदपत्रासह आपले बयान दर्ज करणाकरिता तहसील पोलीस स्टेशनात बोलावले परंतु कोणीही दिलेल्या वेळेवर कागदपत्राचा आले नाही. म्हणून पोलिसांनी शेवटी संधी देऊन डीसीपी झोन 3 यांच्या समक्ष दि. 28 जुलै 2023 रोजी अर्जदार व मज्जाव करणाऱ्या लोकांना बोलावून एक मीटिंग ठेवली त्या मीटिंगमध्ये मज्जाव करणाऱ्या लोकांनी जमिनीशी संबंधित कोणतेही कागदपत्र सादर करू शकले नाही. त्यामुळे दि 31 ऑगस्ट 2023 रोजी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त डीसीपी झोन 3 यांच्या मार्गदर्शनात नगर भूमापन कर्मचाऱ्यांनी मोजणी प्रारंभ केला. परंतु मोजणी करूनही शून्यच राहायला. तेथील मोजणीस मज्जाव करणाऱ्या लोकांच्या उपद्रवामुळे आज पावतो मूळ जमीन मालक जमिनीवर खुणा दर्शविणारे मानाकन करू शकला नाही.
अनेकदा मालिकाच्या जमिनीवर कामकाज करण्याचे प्रयत्न केले परंतु उपद्रव करणाऱ्या लोकांसमोर एकटा माणूस टिकू शकला नाही म्हणून पोलिसांची मदत घेतली तरी सुद्धा हाताचे संरक्षण करू शकला नाही. त्यामुळे आजही आपल्या मानवी हक्कापासून वंचित आहे. याला जबाबदार कोण? बंदोबस्त असूनही लोकतंत्रतात मानवी हक्काचे संरक्षण होऊ शकत नाही आणि भीड तंत्रांचें वर्चस्व असल्याने पोलीस प्रशासन देखील दबावात आहे. आज पावेतो शासनाच्या कामकाजात वेळोवेळी अडथळा निर्माण करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई का करण्यात आली नाही. हे समजण्या पलीकडे आहे, या क्षेत्रातील काही लोकांनी अर्जदार यांच्याकडून विक्री करून घेतलेली आहे. आणि काही लोकांनी अतिक्रमण केले आहे. अशा कितीतरी मिळकत पत्रिकेवर आजही अर्जदार किंवा परिवाराचे नाव दर्ज आहे.

