रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यातील सातारा वा येथील राशन दुकान क्र. 80 रामभाऊ वटाणे हा गोर गरीब नवीन रेशन धारकांना दुकानातून हाकलून देत आहे व रेशन देण्यात टाळाटाळ करत आहे व अरे रावीची भाषा वापरून दमदाटी करत आहे. त्यामुळे शासनातर्फे देण्यात येणारे अनेक शेतकरी, मजूर, कामगार स्वस्त धान्य मिळणारे नागरिक या लाभा पासून वंचित राहणार आहे.
त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा वतीने निवेदन दिले असून त्यात या राशन दुकानदारावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, महादेव पैठने हे नवीन रेशन धारक आहेत ते आज रेशन दुकानात आनंदाचा शिधा आणण्यासाठी गेले असता रेशन दुकानदार दमदाटी करून दुकानाच्या बाहेर हाकलून म्हणाला कि तुला आता आंनदाचा शिघा भेटणार नाही. तुझ नवीन रेशन कार्ड आहे म्हणून तु नंतर ये व तुला उरला तर देण्याचं बघू असा मनमानी कारभार करत आहे.
मौजे सातारा (वा) येतील दुकान क्र. 80 रामभाऊ वटाणे हे गोरगरीब लोकांना रेशन देण्यास टाळाटाळ करणे विचारल्यास अरेरावीची भाषा वापरणे, तोंडी सांगत आहे तरी गावातील ज्यांच्या नावावर शेती आहे अशा शेतकऱ्यांना आंतोदय योजनेचा फायदा घेत असुन अनुसूचित जातीतील गोरगरीब लोकांना ज्यांना शेती नाही त्यांना APL शेतकरी कार्ड दिले आहे हा रामभाऊ वटाणे खूप गरिब लोकांनावर अन्याय करित आहे तर
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी नसता वंचित बहुजन आघाडी आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल अशा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

