Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर शहरात गर्भवती पत्नीला सोडून चक्क जावयाने थाटला सासू बरोबर संसार!

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 26, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर शहरात गर्भवती पत्नीला सोडून चक्क जावयाने थाटला सासू बरोबर संसार!
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदिप सुरडकर, नागपुर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- प्रेम हे कधी कुणावर होईल याचा नेम नाही. पण नागपुरात एका प्रेम प्रकरणाने संपूर्ण नागपुरात खळबळ उडवून दिली आहे. येथे आपल्या पत्नीच्या आईवर म्हणजेच सासुवर एक जावयाचा जीव जळला आणि जावई व सासूच्या पवित्र नात्याला काळीमा फासला गेला.

नागपुर शहरात राहत असलेल्या आपल्या मुलीचा घरी पाहुणी म्हणून आलेल्या सासूवर जावयाचा जीव जडला. दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके डूबून गेले की, आपण जावई आणि सासू आहोत हे विसरून गेले. यावेळी सासू ने आपल्याच पोटच्या मुलीच्या संसाराचा विचार न करता स्वतःच जावया बरोबर नव्याने संसार थाटला. त्यामुळे पत्नीने पती आणि आईविरुद्ध भरोसा सेलमध्ये धाव घेतली.

नागपुर शहरातील गिट्टीखदान येथे राहणारी महिला शांता (बदललेले नाव) या महिलेच्या पतीचे लग्नाच्या तिसऱ्याच वर्षी निधन झाले. पतीच्या निधनानंतर काही महिन्यांच्या चिमुकल्या मुलीसह ती माहेरी आली. ती खासगी नोकरी करीत वृद्ध आई आणि मुलीसह राहते. मुलगी मोठी झाल्यानंतर शांता हिने नातेवाईकांच्या मदतीने मुलीच्या लग्नासाठी स्थळ बघितले. मुलीपेक्षा वयाने 12 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी आपल्या मुलीचे लग्न जुळवले.

मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलीचा संसार सुखाने सुरु होता. तर ती वृद्ध आईसह राहत होती. त्यात तिची मुलगी तीन महिन्यांची गर्भवती असल्यामुळे मदतीसाठी आई मुलीच्या घरी आली. यादरम्यान 42 वर्षीय सासूवर जावई विनोद वय 35 वर्ष याचा जीव जडला. गर्भवती पत्नीची सेवा सोडून विनोदने सासू शांताशी जवळीक साधली. विधवा असलेल्या सासूनेही जावई या नात्याचा विचार न करता प्रेमसंबंध प्रस्थापित केले. पती आणि आईच्या प्रेमसंबंधाबाबत मुलीला कोणतीही कल्पना नव्हती. मुलीला बा‌ळ झाले. सुजाताने जावई, नात आणि मुलीला स्वतःच्या घरी नेले. तेव्हापासून जावई-सासूचे प्रेमसंबंध वाढले. पती आणि आईची जवळीक मुलीला खटकली. एकेदिवशी पती आणि आई दार बंद करून खोलीत दिसले. मुलीचा पारा चढला. तिने पतीची समजूत घातली. मात्र, पती आणि आईने तिला प्रेमसंबंध असून आम्हाला वेगळे राहायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे तिला धक्काच बसला. सासू-जावयाने भाड्याने खोली केली आणि नव्याने संसार थाटला. सख्ख्या आईनेच संसार उद्धवस्त केल्याने ती हतबल झाली. नातेवाईकांनीसुद्धा दोघांचीही समजूत घातली. परंतु, उपयोग झाला नाही.

मुलीने घेतली भरोसा सेलमध्ये धाव.. गेल्या वर्षभरापासून आई आणि पतीने वेगळा संसार थाटला. तर मुलगी आजी आणि चिमुकलीसह राहते. नातेवाईकांकडून तोडगा काढून बघितल्यानंतरही दोघेही एकमेकांचा साथ सोडायला तयार नव्हते. शेवटी मुलीने पती व आईच्या विरुद्ध भरोसा सेलमध्ये धाव घेतली. पोलीस निरीक्षक सीमा सूर्वे यांनी प्रकरण समजून घेतले. सासू आणि जावयाला बोलवून घेतले. दोघांचीही समजूत घातली. मुलीचा संसार तोडून मुलाच्या वयाच्या जावयाबरोबरच्या स्वतःच्या संसाराचा मोह सोडण्यासाठी प्रवृत्त केले. शेवटी जावई-सासू यांनी चूक कबुल केली. पत्नी व चिमुकल्या मुलीसह तो घरी परतला, तर सासू पुन्हा वृद्ध आईसह आपल्या घरी राहायला गेली.

Previous Post

बल्लारपुर के पेपर मिल में कामगार के मौत के बाद तहसील में तनाव.

Next Post

ओबीसी आरक्षणासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने समुद्रपूर येथे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ओबीसी आरक्षणासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने समुद्रपूर येथे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

ओबीसी आरक्षणासाठी भारत राष्ट्र समितीच्या वतीने समुद्रपूर येथे डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In