संदिप सुरडकर नागपुर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा व संताजी औद्योगिक मंच तर्फे समाज भूषण पुरस्कार समारोह 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. या पुरस्कार समारोह आयोजक अजय धोपटे (संस्थापक), सहआयोजक अजय कांबळे, मुख्य अतिथी डॉ. माधवी खोडे चवरे भा.प्र.से. अपर आयुक्त महसूल नागपूर, संजय पाटील अपर आयुक्त गुन्हे शाखा नागपूर हे होते.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करून राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विविध क्षेत्रातील लोकांचा समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात अंकिता नाराळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी पास झाला बदल, इशिका अंतूरकर गोल्ड मेडल वूशू गेम्स मिळवल्या बदल, पायल तळेकर चार्टर्ड अकाउंटंट पास झाल्या बदल त्यांना संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे सन्मान पत्र, ट्रॉफी आणि 5000/- प्रत्येकी देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन चित्राताई माकडे विख्यात समाज सेविका यांनी केले. यावेळी इतर विशेष अतिथी म्हणून डॉ. चंद्रशेखर पाखमोडे नियुरोन हॉस्पिटल नागपूर, डॉ. क्षितिज गुल्हाने नियुरो केअर हॉस्पिटल, प्रशांत वानोडे राणा ग्रुप ऑफ इंडस्ट्री, अनिल वानोडे, प्रतिभा खोब्रागडे, पूजा कांबळे, तुषार खोब्रागडे, राहुल शाहू हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी सुप्रसिध्द आर्टिस्ट पूजा कांबळे यांनी बनवलेली डॉ. माधवी खोडे यांची हुबेहूब पैंटिंगने सर्वांचे विशेष लक्ष वेधले.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

