यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन यवतमाळ:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. झरी जामणी तालुक्यातील कोडपाखिंडी येथील जंगलात विवाहित प्रेमियुगुलाने एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
झरी जामणी तालुक्यातील कोडपाखिंडीच्या जंगलात आज सकाळच्या सुमारास मंदा अर्जुन गाऊत्रे वय 30 आणि नामदेव गोविंदा खडसे वय 33 वर्ष हे विवाहित प्रेमीयुगुलाचे एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पाटण पोलीस ताप्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार कोडपाखिंडी गावातील नामदेव खडसे यास एक मुलगी व एक मुलगा आहे. तर मंदा अर्जुन गाऊत्रे हिला दोन मुली आहेत. हे दोघे पण विवाहित होते तरी मागील काही वर्षांपूर्वी नामदेव व मंदा यांचे प्रेमसंबंध जुळले. सहा महिन्यांपूर्वी दोघेही गावातून पळून गेल्याचे सांगण्यात येते. पण घटनेच्या तीन दिवसांपूर्वी दोघेही गावात परत आले होते. परंतु त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरात घेण्यास नकार दिल्याने, गुरुवारी सायंकाळी दोघेही कोडपाखिंडी गावातून काही अंतरावर असलेल्या जंगलात गेले. तिथे मुरूमच्या खाणीत असलेल्या झाडाला नायलॉन दोरी बांधून त्यांनी एकाच दोराला दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348

