Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

जिजाऊ संस्थेचे धिरज सांबरे यांच्या सामाजिक बांधिकीने गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 30, 2023
in ठाणे, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
जिजाऊ संस्थेचे धिरज सांबरे यांच्या सामाजिक बांधिकीने गरीब विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्री नितीन शिंदे, ठाणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन ठाणे:- शिक्षण घेत असताना आपल्या भविष्याच्या वाटा ठरवताना डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्नं अनेकजण पाहतात मात्र परिस्थिती अभावी अनेकांची स्वप्ने ही अधुरीच राहतात आणि मग त्यांना पर्यायी मार्ग स्वीकारावे लागतात. एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्नं बघणाऱ्या विशाल पाटील ह्या विद्यार्थ्याच्या बाबतीतही अगदी हेच घडणार होते. मात्र त्याच्या परिस्थितीबद्द्ल उद्योजक धिरज सांबरे यांना कळल्यानंतर त्यांनी या विद्यार्थ्याला तब्बल १७ लाखांची मदत केली आहे . त्यामुळे वाडा तालुक्यासह संपुर्ण जिल्ह्यात या अनोख्या सामाजिक बांधिकीबद्द्ल धिरज सांबरे तसेच जिजाऊ संस्थेचे कौतुक केले जात आहे.

तळागाळांतील मुलांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जात आहेत. तर पैशांअभावी शिक्षणापासून वंचित असलेल्या अनेकांना जिजाऊ संस्थेच्या माध्यमातुन जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आर्थिक मदतही केली आहे.

आई वडील नसलेला कोल्हापुरचा गरीब कुटुंबातला स्वप्नील माने या विद्यार्थ्यालाही आर्थिक मदत करत त्याचा IPS पर्यंतचा प्रवासात जिजाऊ संस्थेने मोलोचे सहकार्य केले होते. तर मोखाडा तालुक्यातील परिस्थीती अभावी शिक्षण अर्धवट सोडणा-या मोहिनी भारमल हिच्या संपुर्ण कुटुंबाची जबादारी जिजाऊ संस्थेनेले घेउन तिच्या पंखाना बळ दिले आणि अग्निश्मक दलात निवड झाली. अश्या एक ना अनेक युवक युवतींच्या भविष्यातले स्वप्नं पुर्ण करण्यासाठी जिजाऊ संस्था आणि निलेश सांबरे हे खंबीरपणे पाठिशी उभे राहिले आहेत. हाच वारसा पुढे चालवत निलेश सांबरे यांचे चिरंजीव धिरज सांबरे यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्नं बघणाऱ्या पालघरच्या वाडा तालुक्यातील विशाल संतोष पाटील याला आर्थिक साह्य करत त्याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे.

वाडा तालुक्यातील एका सामन्य शेतकरी कुटुंबातील विशाल पाटील याने क्लासची फी भरण्यासाठी फी नसल्याने घरीच अभ्यास करत मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने NEET मध्ये 470 गुण मिळवून वाडा तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. परंतु वडील एक सामान्य शेतकरी असल्याने पुढे जाऊन विशालला वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी लागणारी मोठी रक्कम भरता येणं आवाक्याबाहेरचे होते. पण जशी ही बातमी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांचे सुपुत्र व प्रसिध्द युवा उद्योजक धिरज सांबरे यांना समजली तेव्हा त्यांनी कसलाही विचार न करता विशालची संपूर्ण प्रथम वर्षीय MBBS ची फी 17 लाख 12 हजार रुपये भरून त्याला ऍडमिशन घेऊन दिले आहे. तर यापुढेही त्याचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत त्याची संपुर्ण जबादारी ही उद्योजक धिरज सांबरे यांनी घेतली आहे.

सध्याच्या एकमेकांच्या ताटातले ओरबाडुन खाण्याच्या युगात एवढी मोठी रक्कम दुसऱ्याच्या शिक्षणासाठी देणं ही केवळ स्वप्नवतच गोष्ट आहे . मात्र आज निलेश सांबरे यांनी जिजाऊ संस्थेच्या माध्यामातुन जपलेली समाजिक बांधिलकीची ही बिजं इतरांच्यातही अंकुरत आहेत त्याचे हे उदाहरण आहे . विशालचे एमबीबीएस डॉक्टर होण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार असुन याबद्दल विशालच्या कुटुंबात आणि नाणे गावातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोषित आनंदाचे वातावरण आहे. जिजाऊच्या या कार्याचे सर्वत्रच कौतुक होत आहे .

Previous Post

अवैध व्यवसायाला आशीर्वाद देणाऱ्या परतूर येथील पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा: वंचित बहुजन आघाडी

Next Post

खुन करून मुंबईत किन्नर बनून राहणा-या आरोपीस पोलीसांनी केले जेरबंद, गुन्हे शाखा युनिट १ ने केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा, दोन आरोपी गजाआड…

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खुन करून मुंबईत किन्नर बनून राहणा-या आरोपीस पोलीसांनी केले जेरबंद, गुन्हे शाखा युनिट १ ने केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा, दोन आरोपी गजाआड…

खुन करून मुंबईत किन्नर बनून राहणा-या आरोपीस पोलीसांनी केले जेरबंद, गुन्हे शाखा युनिट १ ने केला खुनाच्या गुन्हयाचा उलगडा, दोन आरोपी गजाआड...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In