Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

शिक्षक बंडू निखाडे व विजय वनकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 30, 2023
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
शिक्षक बंडू निखाडे व  विजय वनकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भोयगांव (दि. 3०):- स्थानिक राजेंद्र विद्यालय भोयगांव येथे श्री. बंडू झावरू निखाडे गणित शिक्षक व श्री. विजय बापूराव वनकर यांच्या सेवानिवृत्ती सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त होणाऱ्या श्री. बंडू झावरू निखाडे व श्री. विजय बापूराव वनकर यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह व भेट वस्तू देवून सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था राजुरा चे अध्यक्ष वासुदेव पाटील झाडे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव उत्तमराव मोहितकर, सहसचिव मोतीराम पाटील उरकुडे, कोषाध्यक्ष रमेशराव पिंपळशेंडे होते.

यावेळी सत्कार मूर्ती बी. झेड. निखाडे व सौ. सरोजताई निखाडे आणि व्ही. बी. वनकर व सौ. करूणाताई वनकर उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष राजेंद्रजी वरारकर, सदस्य सर्वश्री विनोदजी भगत, विजय ताजने, शांतारामजी गोहणे उपस्थित होते. तसेच राजेंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चटप सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्वागत गीताने व पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. एस. चटप यांनी केले. यानंतर सत्कार मूर्तींचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार मूर्तींच्या जीवन कार्याचा परिचय कु. व्ही. टी. वैद्य यांनी करून दिला. याप्रसंगी विद्यार्थींनी कु. मानसी राजेंद्र वरारकर तसेच डी. डी. ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले. जी. एम. लांडे यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. तसेच आपल्या मनोगतात विद्यार्थी, पालक, शिक्षक व संस्थापक यांनी शाळेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी चिंता न करता, चिंतन केले पाहिजे त्याचबरोबर आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले.

याप्रसंगी प्रमुख पाहूणे रमेश पिंपळशेंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. सत्कार मूर्ती विजय बापूराव वनकर यांनी सत्काराला उत्तर देतांना आपण कारकिर्दीत प्रामाणिकपणे काम केल्याचा निवृत्त होतांना आनंद वाटतो असे मत व्यक्त केले. तसेच सत्कार मूर्ती बी. झेड. निखाडे यांनी संस्थापक मंडळ, सहकारी शिक्षक व विद्यार्थी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले. मा. मोहितकर साहेब यांनी सत्कार मूर्तीने शाळेत केलेल्या सेवेबद्दल प्रशंसा केली. यापुढेही शाळेला मार्गदर्शन करण्याची विनंती केली. अध्यक्षीय भाषणात मा. अध्यक्षांनी सत्कार मुर्तीनी शाळेच्या विकासात दिलेल्या योगदानाबद्दल प्रशंसा केली. सदर कार्यक्रमाचे आभार कु. एस. एन. गाडगे यांनी मानले.

Previous Post

नागपूर शहरातील सर्वात मोठ्या मनोरंजन उद्यान ‘गेमिंग झोन’ला भीषण आग, आगीचे भीषण दृश्य.

Next Post

ताडोबा क्षेत्रातील एकापेक्षा अधिक जिप्सी काढून १ कुटुंब १ रोजगार राबवून सर्वांना समान रोजगाराची संधी द्या: सुरज ठाकरे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ताडोबा क्षेत्रातील एकापेक्षा अधिक जिप्सी काढून १ कुटुंब १ रोजगार राबवून सर्वांना समान रोजगाराची संधी द्या: सुरज ठाकरे यांची मागणी.

ताडोबा क्षेत्रातील एकापेक्षा अधिक जिप्सी काढून १ कुटुंब १ रोजगार राबवून सर्वांना समान रोजगाराची संधी द्या: सुरज ठाकरे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In