Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

ताडोबा क्षेत्रातील एकापेक्षा अधिक जिप्सी काढून १ कुटुंब १ रोजगार राबवून सर्वांना समान रोजगाराची संधी द्या: सुरज ठाकरे यांची मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 30, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
ताडोबा क्षेत्रातील एकापेक्षा अधिक जिप्सी काढून १ कुटुंब १ रोजगार राबवून सर्वांना समान रोजगाराची संधी द्या: सुरज ठाकरे यांची मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदुरकर, कोरपना तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- सविस्तर वृत्त असे की, सद्यस्थितीमध्ये आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत ज्वलंत अशा परिस्थितीमध्ये बेरोजगारांच्या उदरनिर्वाह करिता “रोजगार हा सर्वांनाच हवा आहे..! परंतु ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प जिल्हा चंद्रपूर येथे गेल्या दहा वर्षापासून एकाच कुटुंबांमधील एकापेक्षा अधिक ओपन जिप्सी सफारी चा रोजगार एकाच कुटुंबातील सदस्यांच्या नावांनी वनविभाग प्रशासनाची दिशाभूल करून मिळून बसल्याचा प्रकार हा काही नवीन नाहीच. परंतु कुठेतरी याच कारणाने इतर गरजू

बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळण्यास अडथळा निर्माण होत असल्याने इतर बेरोजगार तरुण-तरुणी या रोजगारापासून वंचित आजही आहेत. याबाबत तक्रारी याआधी सुद्धा झाल्या आहेत. या गंभीर समस्येला घेऊन आम आदमी पक्षाचे सुरज ठाकरे, जिल्हाध्यक्ष कामगार संघटन तथा जिल्हा उपाध्यक्ष, चंद्रपूर यांनी १ वर्षा आधी एक कुटुंब एक जिप्सी करून सर्वांना रोजगाराची समान संधी देण्याबाबत वनविभाग प्रशासनाला दिनांक ०५ नोव्हेंबर २०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते. याचबरोबर ताडोबा क्षेत्रामध्ये “१ कुटुंब १ रोजगार” योजना राबवून वाढती बेरोजगारी कमी करण्याकरिता आणखी दिनांक ११ नोव्हेंबर २०२२ रोजी संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. यानंतर दिनांक:- २० डिसेंबर २०२२ रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाची दखल घेत कार्यकारी संचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यास पत्र पाठविले होते. परंतु वर्ष होऊन देखील आजही ताडोबा क्षेत्रामध्ये एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक ओपन जिप्सी चे रजिस्ट्रेशन होऊन जिप्सी धारकांना परवाना देऊन वन विभागाने इतर बेरोजगारांना डावलून एकाच कुटुंबातील सदस्यांना रोजगाराची संधी मिळवून दिली आहे. अशा प्रकारामुळे त्या ठिकाणी शहरातील तरुणांना स्थानिक रहिवाशी हवे असल्याचे कारण देत रोजगार तर नाहीच परंतु शेजारच्या गावातील लोकांना देखील जिप्सीचा कोटा फुल असल्याचे कारण सांगून रोजगार मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. कारण या क्षेत्रातील इतरही गावकरी नवीन जिप्सी घेऊन लावण्यास इच्छुक आहेत परंतु एकापेक्षा अधिक असलेल्या जिप्सी धारकांमुळे इतर इच्छुकांना या ठिकाणी रोजगार मिळण्यास अडथळा निर्माण होत आहे. करिता इतरांनाही संधी मिळावी याकरिता सुरज ठाकरे यांनी १ कुटुंब १ रोजगार राबवून सर्वांना समान रोजगार देण्याबाबत प्रशासनाला आज दिनांक:- ३० सप्टेंबर २०२३ रोजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन दिले.


या निवेदनामध्ये नमूद एकापेक्षा अधिक ओपन जिप्सी धारकांपैकी सुरज ठाकरे यांना प्राप्त तक्रारीनुसार: खालील सर्व सदस्य एकाच कुटुंबामध्ये वास्तव्यास असून हे सदसस्थितीत मोहोर्ली येथील रहिवासी नाहीच. एकाच कुटुंबातील जिप्सी धारक:- १) सौ. वनमाला प्रेमदास कातकर – MH-32-AH- 2016 (ML- 58) कोर २) सौ. संगीता प्रेमदास कातकर – MH-34-AM- 4082 (ML- 46) कोर ३) दिपक प्रेमदास कातकर – MH-34-AM- 7825 (ML- 46) बफर वरील सर्व लाभार्थी हे:- राहणार: BJM कारमेल अकॅडमी स्कूल, च्या मागे राजलक्ष्मी अपार्टमेंटच्या बाजूला, छत्रपती नगर तुकूम येथे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून वास्तव्यास आहेत.

१) सौ. वनमाला प्रेमदास कातकर (जिप्सी रोजगार लाभार्थी असून देखील वन विभागाकडून २०,०००/- रुपये प्रति /महा पेन्शन धारक) २) सौ. संगीता प्रेमदास कातकर तिसरी मुलगी (जिप्सी रोजगार लाभार्थी तथा /नर्स असून चंद्रपूर जिल्ह्यातील दवाखान्यांमध्ये सेवा देत आली आहे. ३) श्री. दिपक प्रेमदास कातकर मुलगा (जिप्सी रोजगार लाभार्थी/मेकॅनिकल इंजिनिअर/ अनुकंपा तत्वा मधील राखीव नोकरी यासह मोहोर्ली येथील MTDC रोड वर ३ AC/Non AC सूट चे वाईल्ड होम स्टे आहे.

वरील सर्व सदस्य चंद्रपूर महानगर पालिका निवडणुकी मध्ये मतदान करतात तथा यांची त्या यादीमध्ये नावे देखील आहेत. ज्याची माहिती मतदारसंघाच्या यादीमध्ये नमूद आहे. तरीदेखील या कुटुंबातील ३ जिप्सी धारक मोहोर्ली येथे यांचे वास्तव्यास राहायला घर नसून रोजगार प्राप्त करण्याकरिता बांधलेले फक्त तीन रूम आणि १ किचन चे होम स्टे आहे. तरी देखील यांनी मोहोर्ली ग्रामपंचायत ची दिशाभूल करत मोहोर्ली येथील रहिवासी दाखला प्राप्त करून मोहोर्ली येथील रहिवासी असल्याचा दावा करतात हे जिप्सी रोजगार लाभार्थी सर्रासपणे बेकायदेशीर फर्जी काम करून रोजगार प्राप्त केली आहे. अशाच प्रकारे या कुटुंबाने रोजगार प्राप्ति करिता वन विभागाची देखील दिशाभूल केलेली असून हा प्रकार बेकायदेशीर असल्याने यांच्यावर दंडात्मक कारवाई करून तात्काळ यांच्या जिप्सी काढण्यात याव्या अशी मागणी यावेळेस सुरज ठाकरे, आप जिल्हाध्यक्ष कामगार संघटन तथा उपजिल्हाध्यक्ष, चंद्रपूर यांनी प्रशासनाला करून इतर गरजू बेरोजगारांना या ठिकाणी १ कुटुंब १ रोजगार योजना राबवून अत्यंत गरजू बेरोजगारांना रोजगाराची समान संधी देण्यात यावी अशी मागणी समस्त तक्रार कर्त्यांन तर्फे केलेली आहे.

Previous Post

शिक्षक बंडू निखाडे व विजय वनकर यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! झारखंड राज्यातील इसमांकडून ससून हॉस्पिटल जवळ 2,14,30,600/- किमतीचा 1 किलो 71 ग्राम 53 मिलीग्राम मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त….

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! झारखंड राज्यातील इसमांकडून ससून हॉस्पिटल जवळ 2,14,30,600/- किमतीचा 1 किलो 71 ग्राम 53 मिलीग्राम मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त….

अंमली पदार्थ विरोधी पथक २ ची दमदार कामगिरी ! झारखंड राज्यातील इसमांकडून ससून हॉस्पिटल जवळ 2,14,30,600/- किमतीचा 1 किलो 71 ग्राम 53 मिलीग्राम मॅफेड्रॉन हा अमली पदार्थ जप्त....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In