पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
अंमली पदार्थ विरोधी पथक २ पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- अमली पदार्थ विरोधी पथक 2 कडील पोलीस निरीक्षक सुनील थोपटे तसेच पथकातील अंमलदार हे पुणे स्टेशन परिसरात दिनांक ३०/०९/२०२३ रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार चेतन गायकवाड यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की एक इसम हा ससून हॉस्पिटल परिसरात अमली पदार्थ विक्री करता येत आहे मिळाले बातमीवरून अमली पदार्थ विरोधी पथक दोन कडील अधिकारी अंमलदार यांचे सह सापळा लावला असता ससून हॉस्पिटलचे समोर आंबेडकर पुतळ्याच्या कंपाउंड लगत असलेल्या बस स्टॉप शेजारी एक इसम संशयतरित्या पाठीवर सॅक बॅग घेऊन थांबलेला दिसला त्यास ताब्यात घेऊन त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सुभाष जानकी मंडल वय 29 वर्ष रा- शितला नगर, नूर कार गॅरेज, मध्ये देहूरोड पुणे मूळ राहणार राज्य- झारखंड असे सांगितले. त्याचे ताब्यातून किंमत रुपये २,१४,३०,६००/- रुपये किमतीचा १ किलो ७१ ग्रॅम ५३ मिलीग्राम मेफेड्रोन (M.D)हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यास सदरचा अमली पदार्थ हा ससून हॉस्पिटल वार्ड क्रमांक १६ मध्ये उपचारा कामी ऍडमिट असलेला येरवडा जेल कैदी इसम नामे ललित अनिल पाटील वय 34 वर्ष सध्या ससून वार्ड क्रमांक 16 युटी क्रमांक 3352/ 2023 येरवडा जेल पुणे याने ससून हॉस्पिटल कॅन्टीन मध्ये काम करणारा इसम नामे रौफ रहीम शेख व १९ वर्ष राहणार ताडीवाला रोड पुणे याचे करवी विक्री करिता पुरविला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३०६/२३ एनडीपीएस कलम ८( क ). २२ ( क ),२९ भादवी कलम 201 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वरील नमूद कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री रितेश कुमार मा. सह पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे मा. पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे २ श्री. सतीश गोवेकर यांचे मार्गदर्शना खाली अमली पदार्थ विरोधी पथक २,गुन्हे शाखा, पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी नरके , पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण , पोलीस अंमलदार चेतन गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार शिवाजी घुले, संतोष देशपांडे, संदीप जाधव, प्रशांत बोमदंद्दी, रवींद्र रोकडे, मयूर सूर्यवंशी, दिशा खेवलकर, साहिल शेख, महेश साळुंके,संदीप शेळके, योगेश मांढरे, नितीन जगदाळे, अजीम शेख, युवराज कांबळे व दिनेश बासटेवाडी यांनी केली आहे.

