महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गुवाहाटी:- असम राज्यातील करीमगंज जिल्हातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीची गळा दाबून निर्घृण पने हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहा बरोबर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
रेल्वेत नवनियुक्त चतुर्थश्रेणी कर्मचारी याचे या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तो या मुलीवर शारीरिक संबंध बनवण्यासाठी सतत दबाव टाकत होता. मुलगी नकार देत होती. मुलगी घरी एकटी असल्याचे समजल्यानंतर या नराधम आरोपीने आपल्या दोन मित्रांसह मुलीचा घरी गेला. यावेळी या तिघां नराधमांनी बळजबरीने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केल्यानंतर त्यांनी तिचा गळा दाबून हत्या केली त्यानंतर या सर्व नराधमांनी त्या मुलीचा मृतदेहावर बलात्कार केला.
त्याच दिवशी करीमगंज बायपासजवळ तिचा मृतदेह सापडला. मुलीच्या वहीत नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावरून पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला. बिप्लब पॉल, शुभ्रा मालाकर व राहुल दास अशी आरोपींचे नावे आहेत. दास हा सूत्रधार आहे. त्याने चौकशीत मुलीसोबतचे प्रेमसंबंध उघड केले. आपण तिच्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे हे कृत्य केले, अशी कबुली दिली. शुभ्रा मालाकरकडून दोन सिमकार्ड घेतले होते. त्यातील एक तो व पीडित मुलगी वापरत होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

