हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर व डॉ. निलेश विश्वकर्मा, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडी यांच्या आदशाप्रमाणे बल्लारपूर तालुका कार्यकारणी साठी वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारणी आदेश द्वारे घोषणा करण्यात आली असून तालुका युवा आघाडीच्या अध्यक्ष पदी अभिलाष चूनारकर यांची तर महासचिव पदी गौतम रामटेके यांची नियुक्ती करण्यात आले आहे. तसे उपाध्यक्षपदी आचल लाकडे, आरती अलोणे व सदस्य मयूर वानखेडे यांची नियुक्ती केली आहे.
वंचित बहुजन आघाडी चा संघटात्मक बाधनी तसेच पक्ष वाढीचा उद्देशाने जबाबदारी देण्यात आली आहे. पदाचा उपयोग करून पक्षाला नव्या उंचीवर नेण्यासाठी कठीबध राहणार, असे तालुका वंचित बहुजन युवा आघाडीचे नवनियुक्त अध्यक्ष अभिलाष चूनारकर यांनी म्हटले.
यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्या दिल्या.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

