उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- जिल्हातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील मिरज तालुक्यातील अंकली येथे पंधरवड्यापूर्वी पोलिसांनी सुरू केलेल्या नाकाबंदीच्या दरम्यान कारने दिलेल्या धडक दिल्याने पोलीस उपनिरीक्षक रामराव गोविंदराव पाटील वय 55 वर्ष, मूळ रा. डोंगरसोनी ता. तासगाव यांचा अपघात झाला होता. यात ते गंभीररित्या जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला.
गुरूवार दि. 14 रोजी सांगली ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अंकली फाटा येथे नाकाबंदी लावली होती. तेथे जखमी पाटील यांच्यासह इतर पोलिसांचे पथक वाहनांची तपासणी करत होते. रात्री पावणे एकच्या सुमारास मिरजेकडून एक मोटार एमएच 42 बीजे 4693 भरधाव तिथे आली. पोलिस पथकाने या वाहनचालकाला थांबवण्याचा इशारा केला. त्यातच या चौकातील वळण वाहनचालकाच्या लक्षात न आल्याने त्याने रस्त्यावर थांबलेल्या पाटील यांना जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या उपनिरीक्षक पाटील यांच्यावर एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी त्यांचे निधन झाले. ही बातमी पोलीस विभागाला कळतच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी मृतक रामराव गोविंदराव पाटील पार्थिव यांच्या मूळगावी नेण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस दलातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

