Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

चांदीवलीचे माजी नगरसेवक लीना शुक्ला व हरीश शुक्ला यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 4, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
चांदीवलीचे माजी नगरसेवक लीना शुक्ला व हरीश शुक्ला यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश, मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील नगरसेवकांची संख्या 35

नितीन शिंदे ठाणे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मुंबईतील चांदीवली विभागाचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांचा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला. त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

लीना शुक्ला यांनी यावेळी बोलताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केल्याचे यावेळी सांगितले. त्यांच्या कामाचा वेगामुळेच मुंबईत सध्या अनेक बदल घडत आहेत. त्यामुळे त्यांनी कायम मुख्यमंत्रीपदावर कायम रहावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना, शिवसेनेमध्ये या नगरसेवकांचे स्वागत केले. तसेच राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मुंबईत झालेली विकासकामे मुंबईमध्ये झालेला बदल आज लोकांच्या डोळ्यासमोर आहे. आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात सारी कामे ठप्प झाल्यासारखी परिस्थिती होती. कोरोना होता पण तो गेल्यावर देखील ज्या पद्धतीने विकास प्रकल्पाना चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही. वैयक्तिक अहंकारापोटी हे सगळे विकासप्रकल्प थांबवले गेले होते. खरं तर वैयक्तिक स्वार्थ दूर सारत राज्याचा विकास करणे ही प्रत्येक मुख्यमंत्र्याची जबाबदारी असते. मात्र त्यावेळी त्या सरकार मध्ये मी असलो तरी मला नेहमीच याबाबत कमतरता जाणवत असल्याने आम्ही त्यात बदल घडवला. मुंबईतील सगळे रस्ते पुढील दोन वर्षात खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आपला दवाखान्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना सेवा मिळतायत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असून इथे जगभरातून लोकं येतात. त्यामुळे हे शहर खऱ्या अर्थी सुंदर बनवण्यासाठी सुशोभीकरण कामाला विशेष महत्व देण्यात आले आहे.

आजही मुंबईतील कचरा उचलून मुंबईकरांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेणारे कामगार कशा अवस्थेत राहतात ते पहायला मी गेलो होतो. त्यांचं राहणीमान सुधारावे, त्याना देखील पाणी, शौचालय,उत्तम रस्ते आशा सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी मुंबई मनपा आयुक्तांना निर्देश दिले.

शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस मुंबईत वाढत असून 2017साली निवडून आलेले 35 नगरसेवक आज शिवसेनेमध्ये दाखल झाले असल्याचे सांगितले. कारण त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये सोयी सुविधा पाहिजेत. वॉर्डात राहणाऱ्या लोकांना विकास अपेक्षित असून विकास करायचे असेल तर सत्तेची सोबत लागते. कोरोना काळात लोक मरत होती तेव्हा काही लोकं पैसे बनवत होते. बॉडी बॅग, खिचडी सगळ्यात पैसे खाल्ले, घोटाळे केले. मात्र आता स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी सगळे इथे आले आहात. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देतानाच तुम्हाला जो हवा तो विकास नक्की साध्य होईल असे यावेळी बोलताना शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेना प्रवक्त्या श्रीतल म्हात्रे या देखील उपस्थित होत्या.

आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348 / 7385445348

Previous Post

नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेश्वरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा गठित.

Next Post

ग्रामपंचायत कोर्ला सुशीला गणपत वेलादी सरपंचसह ग्रा.प सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ग्रामपंचायत कोर्ला सुशीला गणपत वेलादी सरपंचसह ग्रा.प सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश.

ग्रामपंचायत कोर्ला सुशीला गणपत वेलादी सरपंचसह ग्रा.प सदस्य यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In