Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द नागरीकांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी समुद्रपूर पोलीसांचे जाळ्यात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 4, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
पोलीस असल्याची बतावणी करुन वयोवृध्द नागरीकांना लुटणारी आंतरराज्यीय टोळी समुद्रपूर पोलीसांचे जाळ्यात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हा परीसरात व इतर जिल्ह्यात महामार्गावर मागील काही महिन्यापासून दोन ईसम हे पोलीस असल्याची खोटी बतावणी करुन, ठकबाजी करुन महामार्गावरुन मोटर सायकलने प्रवास करीत असलेल्या वृध्द लोकांवर निशाना साधुन त्यांचे अंगावरील दागीणे पळविण्याचे गुन्हे करीत होते. त्याबाबत समुद्रपूर पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाल्याने, पोलीसांनी गुन्हेगारांचे वर्णन व मोटर सायकल बाबत माहिती प्राप्त केली होती. सदर माहितीच्या आधारे यातील गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांसमोर होते.

समुद्रपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एस. बी. शेगांवकर यांनी गुन्हे अन्वेषण पथक यांना वरील माहीतीच्या आधारे गुन्हेगारांचा शोध घेणे करीता निर्देशीत करुन रवाना केले होते. सदर गुन्हे अन्वेषण पथक हे यातील गुन्हेगारांचा शोध घेत पेट्रोलींग करीत असतांना, दिनांक ३०.०९.२०२३ रोजी मौजा कानकाटी शिवारात प्राप्त वर्णनाचे दोन ईसम मोटर सायकलवर नागपूरकडे जातांना दिसले. पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन थांबविण्याचा ईशारा केला असता, पोलीसांना पाहून दोन्ही गुन्हेगार पळुन जाण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु पोलीसांनी सिनेस्टाईल त्यांचा पाठलाग करीत त्यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव १) इमरान परवेज जाफरी, रा. चिद्री रोड, इराणी कॉलनी, बिदर, जि. बिदर, राज्य कर्नाटक, ह.मु. बिलाल मस्जीद जवळ, भानपूर, जि. भोपाल, राज्य मध्य प्रदेश, २) तमस बिजय सुर्यवंशी, रा. बिलाल मस्जीद जवळ, भानपूर, जि. भोपाल, राज्य मध्य प्रदेश असे सांगीतले.

त्यानंतर त्यांना गुन्ह्यासंदर्भाने सखोल विचारपूस केली असता, त्यांनी वर्धा जिल्ह्यात गुन्हे केल्याची कबुली दिल्याने, त्यांची ताब्यातुन एक मोटर सायकल क्रमांक AP-39/FS-6574 व मोबाईल कि. १,१०,००० रु. चा मुद्देमाल तपासकामी जप्त करण्यात करुन पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील अटक आरोपीतांना न्यायालयासमक्ष हजर केले असता, न्यायालयाने त्यांचा दिनांक 5 ऑक्टोंबर पर्यंत पि.सी.आर मंजुर केला आहे.

सदर गुन्हेगारांनी वर्धा जिल्ह्याचे अभिलेखावर पोलीस स्टेशन देवळी, सेलु, सावंगी, वडनेर, हिंगणघाट, सिंदी (रेल्वे) व नागपूर जिल्ह्यातील रामटेक, उमरेड, भिवापूर, काटोल तसेच कर्नाटक राज्यात बिदर जिल्हा व मध्यप्रदेश भोपाल मध्ये अशा प्रकारचे गुन्हे करण्याची कबुली दिली असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर रतनकुमार कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.बी. शेगांवकर यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रवि पुरोहीत, राजेश शेंडे, सचिन भारशंकर, वैभव चरडे सर्व नेमणुक पोलीस स्टेशन समुद्रपूर यांनी केली.

Previous Post

पुर्वीच्या भांडणाचा राग मनात धरुन जीवे ठार मारणाऱ्या आंदेकर टोळीच्या टोळी प्रमुखासह एकुण ९ आरोपीच्या समर्थ पोलीसांनी आवळल्या मुसक्या….

Next Post

भाजपाची ओबीसी जागर यात्रा 05 ऑक्टोबर ला चंद्रपूरात, बाईक रॅली व भाजपा ओबीसी मेळाव्याचे भव्य आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भाजपाची ओबीसी जागर यात्रा 05 ऑक्टोबर ला चंद्रपूरात, बाईक रॅली व भाजपा ओबीसी मेळाव्याचे भव्य आयोजन.

भाजपाची ओबीसी जागर यात्रा 05 ऑक्टोबर ला चंद्रपूरात, बाईक रॅली व भाजपा ओबीसी मेळाव्याचे भव्य आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In