हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि मोबा. 9764268694
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- स्थानीय महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय बल्लारपूर मध्ये प्लेसमेंट सेल कमिटी द्वारे अर्निंग अपॉर्च्युनिटी प्रोग्राम कार्यक्रम घेण्यात आले.
जिओ फायबर कंपनी ने विद्यार्थ्यांना प्लेसमेंट करीता माहिती दिली. यावेळी जिओ टीमने विद्यार्थ्यांना जिओच्या नवीन योजनांविषयी मार्गदर्शन केले व व्हिडिओ क्लिपिंग दाखवल्या. तसेच जिओ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्टिकोनातून कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकते, माहिती देऊ शकते त्याबद्दल माहिती दिली. तथा जिओ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार कसा उपलब्ध होईल याची सविस्तर माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाचे प्रमुख महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संजय भाऊ कायरकर उपस्थित होते. जिओ मॅनेजर नवनाथ पाटील, नेटवर्क टीम मनोज सुरजागडे, जिओ कस्टमर सर्विसेस संजय मांडवकर, जिओ टीमचे चंद्रशेखर डोंगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.डी.चव्हाण होते. तसेच मराठी विभाग प्रमुख प्रा. कर्णासे उपस्थित होते. संचालन डॉ. किशोर चौरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. स्वप्नील बोबडे यांनी केले.

