हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातून महिला अत्याचाराच्या वेगवेगळ्या दोन खळबळजनक घटना समोर आल्या आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पहिली घटना गोंडपिपरी तालुक्यातील तारसा खुर्द येथे प्रेम संबधात एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक अत्याचार करण्याच्या व्हिडिओ बनवून तो सोशल माध्यमांवर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. दुसरी घटना पोंभुर्णा तालुक्यातील आहे. शाळेत शिकायला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला त्रास देउन तिचा छळ करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोंडपिपरी तालुक्यातील तारसा खुर्द या गावातील आरोपी शुभम देविदास चुदरी वय 20 वर्ष याने तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला प्रेमात आणाभाका देत अडकिवले. त्या मुलीला विश्वासात घेऊन त्यानंतर त्या मुलीशी मोबाईलद्वारे व्हिडिओ कॉलिंग केली आणि अश्लील व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर व्हायरल केला. हा प्रकार मुलीच्या लक्षात येताच मुलीच्या कुटुंबियांनी तात्काळ गोडपिंपरी पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी शुभम चुदरी याला तात्काळ अटक केली. त्याच्यावर पोस्को अंतर्गत 376/6 कलमा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू करत आहेत.
तर दुसऱ्या घटनेत चंद्रपूर येथे खासगी कंपनीत काम करणारा भंडारा जिल्ह्यातील आरोपी पंकज रमेश धकाते वय 28 वर्ष हा पोंभुरणा तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा पाठलाग करत होता. तिला वारंवार फोन करून त्रास देणे, छेड काढणे असे प्रकार नित्याचेच झाले होते. या प्रकाराला कंटाळलेल्या मुलीने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पालकांच्या तक्रारीच्या आधारे पोस्को कायद्याअंतर्गत कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास गोंडपिपरी पोलीस करत आहेत.

