प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जामनी गोजी येथे वीरांगना राणी दुर्गावती यांच्या जयंती निमित्त आदिवासी समाजाचे मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.राणी दुर्गावती यांच्या प्रतिमेचे पूजन करून समाज भवन ते कार्यक्रम स्थळा पर्यंत भव्य रॅली काढण्यात आली.
याकार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार राजुभाऊ तोडसाम, या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, वैज्ञानीक उमेश वावरे, उपसभापती पांडुरंगजी देशमुख, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुनील भुते, राजेश धोटे, सरपंच नामदेव चांभारे, उपसरपंच दिलीप उईके, अजय पर्बत, किशोर चांभारे, तुषार थुटे, पोलीस पाटील नीता महेश पर्बत, कवडुजी उईके गावातील सर्व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

