पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पैशासाठी ठरलेले लग्न मोडून मुलीच्या कुटुंबीयांची बदनामी केल्याप्रकरणी दोघा भावा-बहिणींवर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही शहर वाहतूक विभागात कार्यरत आहेत.
आसिफ फखरुद्दीन पठाण (२७, , रा. विश्रांतवाडी पोलीस लाईन), रुकय्या फखरुद्दीन पठाण (३१, रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत भवानी पेठ येथील २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. ऑगस्ट २०२२ ते मे २०२३ दरम्यान हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२२ मध्ये फिर्यादी यांना असिफ याच्याशी लग्नासाठी स्थळ आले होते.
फिर्यादी पसंत पडल्यानंतर सर्वानुमते २३ ऑक्टोबर रोजी कोंढवा येथे साखरपुडा झाला. त्यानंतर असिफचे फिर्यादीचे फोनवर बोलणे सुरू झाले. यादरम्यान फिर्यादीच्या घरच्यांनी घरगुती वापराचे काही साहित्य असिफला दिले. मात्र, १५ लाख रुपयांचे सोसायटीचे कर्ज काढले असून, ते परतफेड करण्यासाठी तुझ्या घरच्यांकडून दहा लाख रुपये घेऊन दे, असे असिफ फिर्यादीला म्हटला. यावरूनच त्यांच्यात मतभेद झाले. २१ मे रोजी लग्नाची तारीख ठरली असताना, काही दिवस अगोदरच असिफची बहीण साहित्य घेऊन ते परत करण्यासाठी फिर्यादीच्या घरी आली..त्यामुळे लग्नासाठी खर्च करण्यास भाग पाडून समाजामध्ये बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत.

