अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन अकोला:- सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे हे आपल्या शेतात काम करण्यासाठी अकोला ते आलेगांव ला गेले होते. शेतातील काम आटोपून ते गोळेगाव ते अकोला रस्त्याने येत असतांना बाभुळगांव रस्त्यावर त्यांना ३५ हजार रूपये कीमंतीचा विवो कंपनीचा मोबाईल रस्त्यावर सापडला.
सामाजिक कार्यकर्ता सतिश तेलगोटे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मोबाईलचे मूळ मालक राजदहार पठाण यांना तो मोबाईल फोन परत करण्यात आला. आपला मोबाईल फोन परत मिळताच राजदहार पठाण यांनी सामाजिक कार्यकर्ते सतीश तेलगोटे यांचे मनापासून आभार मानले. सतिश तेलगोटे यांनी मोबाइल मुळ मालकाला परत करून माणुसकी जपल्याचा प्रत्यय आला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

