पंकेश जाधव पुणे चिफ ब्युरो 7020794626
चंदननगर पोलीस स्टेशन पुणे शहर
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- दि. १०/१०/२०२३ रोजी चंदननगर पो. स्टे कडील तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत माने व अंमलदार श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, शिवाजी धांडे, गणेश हाडंगर पोलीस स्टेशन हद्दीत कर्तव्यावर असताना पोलीस अंमलदार श्रीकांत कोद्रे, पोलीस अंमलदार सुरज जाधव यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, येरवडा पोलीस स्टेशन रेकॉर्डवर असलेला व तडीपार आरोपी नामे रोहित राजु धाडवे रा लक्ष्मी नगर गेनबा शाळेसमोर, येरवडा पुणे हा चंदननगर पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये रिव्हर डेल सोसायटी नदीपात्रामध्ये कडेचा सिमेंट रोड येथे त्याचे जवळ पिस्टल जवळ बाळगुन वावरत आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर मा वरिष्ठाचे मार्गदर्शनाखाली वरील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी रिव्हर डेल सोसायटी नदी कठेचा सिमेंटचे रोडचे बाजुला झाडाखाली उभा असलेल्या दिसला तेव्हा पोलीस त्याचे दिशेने येत असल्याचे पाहून पळुन जावु लागला तेव्हा सर्व पोलीस स्टॉफनी मिळुन त्यास शिताफीने पकडून त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव रोहित राजु धाडवे वय २२ वर्षे सध्या रा संघर्ष चौक चंदननगर पुणे असे असल्याचे सांगितले. अंगझडतीमध्ये त्याचे कंबरेला मागील बाजुस पॅन्टचे आतमध्ये खोचुन ठेवेलेले एक लोखंडी अग्निशस्त्र मिळून आले आहे. तसेच सदरचा आरोपी हा मा पोलीस उपआयुक्त सेा परि०४ यांचे तडीपार आदेश क २७/२०२३ अन्वये दिनांक ०७/०७/२०२३ रोजी पासुन पुणे शहर व पिंपरी चिंचवड व पुणे जिल्हयातून २ वर्षांकरिता तडीपार असतानाही आदेशाचे भंग केल्याने त्याचे विरुद्ध अंमलदार सुरज जाधव यांनी चंदननगर पो.स्टे गु.र.न. ४७२/२०२३ आर्म अॅक्ट कलम ३/२५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३). १३५ व १४२ अन्वये गुन्हा नोंद केला असुन त्यास अटक केली आहे. त्यांचेवर येरवडा पोलीस स्टेशनला १) गुरनं ७०/ २०२२ भादंवि ३०७ आर्म अॅक्ट ४ (२५) २) गुरनं ५५३ /२०२१ मादंवि ३९४ चंदननगर पोलीस स्टेशनला ३) १५/२०२२ भादंवि ३८४ इतर कलमान्वये गुन्हे नोंद आहेत.
सदरची कामगिरी ही मा. रंजनकुमार शर्मा सा अपर पोलीस आयुक्त पुर्व विभाग पुणे शहर, मा. शशिकांत बोराटे सा, पोलीस उपआयुक्त परीमंडळ ४ पुणे शहर, मा. संजय पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, यांनी दिलेल्या सुचने प्रमाणे मा. राजेंद्र लांडगे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक सो. चंदननगर पो.स्टे. पुणे शहर, मा. मनिषा पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे)सतो. चंदननगर पो.स्टे. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक प्रशांत माने, पोलीस अंमलदार, गणेश हाडंगर, शिवाजी धांडे श्रीकांत शंडे, सचिन रणदिवे, अविनाश संकपाळ, सुभाष आव्हारा, महेश नाणेकर, सुहास निगडे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव शेखर शिंदे यांनी केली आहे.

